एप्रिल व मे महिना हा उन्हाळी सुट्टीचा महिना. परीक्षा संपली की शाळेला सुट्टी लागते. मग दिवसभर करायचे काय हा प्रश्न पालकांना व मुलांना सतावत रहातो. मग परीक्षा संपण्याच्या आतच ठरवले जाते. व सुट्टीचे नियोजन केले जाते. वेगवेगळ्या छंद वर्गची चौकशी केली जाते. विशेष म्हणजे जे पालक दोघही कामा निमित बाहेर असतील त्यांना सुट्टीत मुलांना कसे व्यस्त ठेवायचे हा प्रश्न असतो व तो बरोबर पण आहे.
आपली मुले कशी आहेत, त्यांना काय आवडत व काय आवडत नाही ह्याची कल्पना प्रत्येक पालकांना असते. प्रत्येक पालकांना वाटते की आपले मुल स्पेशल आहे. त्याला इतर मुलांपेक्षा वेगळा छंद वर्ग लावूया. आपली मुले सगळीकडे पुढे आली पाहिजेत म्हणून पालक झटत असतात.
साधारणपणे पालक मुलांबद्दल असं बोलत असतात.
आमची सुधा खूप छान चित्र काढते. तिला केव्हापण चित्र काढायला सांगा ती तयार असते. पण दुसरा सूर असा असतो की चित्र काढून काय उपयोग जर तसाच चांगला अभ्यास केला तर उपयोग होईल. पण आता सुट्टीत तर तीची चित्रकलेची आवड पूर्ण करू शकता.
अनन्या नुसती दिवसभर अभ्यास करत बसते, तिला बाकी कशाची आवड नाही. तिला तीच्या मैत्रिणी खेळायला बोलवतात पण ती जात नाही. ह्या वयात खेळायला पाहिजे. ठीक आहे तिला अभ्यासाची आवड असेलतर तिला अभ्यासातूनच खेळाचे महत्व पटवून सांगता येते.
नीलाला गाण्याची आवड आहे. तिला अभ्यासात जास्त गोडी नाही, तर तिला एखादे वाद्य आणुन द्यावे. चांगल्या गाण्याच्या सिडी लावाव्यात काही गाण्याचे कार्यक्रम आयकायला घेवून जावे.
आता सुट्ट्या आहेत त्यामुळे अभ्यासाचा प्रश्न नाही तर मुलांना प्राण्याची आवड असते तर एक पाळीव प्राणी घेवून त्याची कशी काळजी घ्यावी ते सांगावे.
काही मुलांना बागेची आवड असते त्यांना कुंड्यांमध्ये झाडे कशी लावावी त्याची कशी काळजी घ्यावी ते सांगावे.
मे महिना आहे व उष्णता पण खूप आहे. मुलांना आवडत असेल तर पोहायला पाठवावे त्याने शरीराला व्यायामपण छान मिळेल.
मुले जेव्हा शाळेत जातात तेव्हा एका वर्गात ५० मुले असतात शिक्षकाना तेवढा वेळ नसतो कारण एव्ह्ड्या मुलां कडे पहायला वेळ नसतो तर आपणच लक्ष ठेवून आपल्या मुलांचे सुप्त गुण शोधून काढायचे जेणे करून आपल्या मुलांना त्याचा फायदा होईल.
जर ते एखाद्या विषयात कच्चे असतील किंवा त्यांना गोडी वाटत नसेल तर त्याविषयी गोडी निर्माण करून त्याचे महत्व पटवून सांगितले पाहिजे.
हे सर्व आपण सुट्टीतच करू शकतो कारण सुट्टीत अभ्यास नसतो त्यामुळे बाकीच्या छद जोपासायला वेळ असतो. तसेच आपल्या मुलाची बुध्दिमत्ता कशात आहे. ते पण ओळखायला पाहिजे. नुसता अभ्यासच करायला पाहिजे असे नाही त्याबरोबर बाकीच्यात सुद्धा गोडी निर्माण करून त्यात खूप पुढे जाता येते. तसेच दुसऱ्या मुलांन बरोबर बरोबरी करू नये त्यामुळे मुलांचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. प्रतेक मुल हे वेगळे असते प्रतेक मुला मध्ये वेगवेगळे चांगले गुण असतात. ते आपण समजून घेतले पाहिजे. तसेच आता स्पर्धा पण खूप असते व त्या स्पर्धेत आपले मुल चांगले पास झाले पाहिजे त्यासाठी आपल्या मुलांची मानसिक तयारी पण आपणच लहान पणा पासून केली पाहिजे.