आंबा (Mango) एप्रिल व मे महिना आलाकी आपण आंब्याची आतुरतेने वाट पहात असतो. आंबा हे फळ असे आहेकी ते सर्व जणांना मनापासून आवडते. परत वर्षातुन एकदाच हे फळ साखायला मिळते. आंब्याचे बरेच गुणधर्म आहेत व तो औषधी पण आहे.
आंबा हे सर्व फळांनमध्ये श्रेष्ठ फळ आहे. म्हणूनच त्याला ‘फळांचा राजा म्हणतात. हे उष्णकटीबंदातील महत्वाचे फल आहे. आंब्याच्या अनेक जाती आहेत. उत्तर भारतात लंगडा, बदामी, बनारसी, दक्षिण भारतात नीलम, तोतापुरी, बंगलोर, महाराष्ट्रमध्ये हापूस, पायरी, गुजरातमध्ये हापूस, पायरी, गोवामध्ये मलगोवा, कपुरी, केशर वगैरे भारतात जवळजवळ सातशे-आठशे जातीचे आंबे होतात.
आंबा कापून किवा त्याचा रस काढून खाता येतो. देशी आंब्याच्या कोयीला रेषा अधिक असतात. हे आंबे चोखून खाणेच योग्य आहे. कलमी आंब्याच्या कोयीला रेषा असत नाहीत. म्हणून असे आंबे कापून खाणेच योग्य असते.
औषधा च्या दुष्टीने पाहता कलमी आंब्या पेक्षा देशी आंबा अधिक लाभदायक असतो. आंबट आंब्यापेक्षा गोड आंबे अधिक फायदेशीर असतात. बीनरेशेचे, अत्यत पिकलेले, जास्त गर असलेले पातळ सालीचे व लहान कोय असलेले आंबे उत्तम समजले जातात.
जेवतांना आंबा खाल्याने मेद वाढतो, हिमोग्लोबीन व लाल कण वाढतात व कफवृद्धी होत नाही. दुध मिक्स करून आंबा खाल्याने वीर्यवृद्धी चांगली होते. आंबे खाणे म्हणजे आतड्यासाठी एक प्रकारचे उत्तम प्रकरचे औषध आहे. चांगला पिकलेला आंबा खाल्याने जठरातील पचनाचे रोग, फुफुसाचे रोग तसेच रक्त कमी असणारे रोग बरे होतात.
चांगले पिकलेले आंबे खाल्याने शरीराची कांती सुंदर व तेजस्वी होते, आळस दूर होतो व रस धातू मुबलक प्रमाणात होतो.
आंब्याच्या रसा मध्ये दुध व तूप मिक्स करून घेतल्याने पिक्ताचे प्रमाण कमी होते. तसेच आंब्याच्या रसात मध मिक्स केल्याने कफविकार दूर होतात.
आंब्याची पोळी ही गुणकारी आहे. त्यामुळे उलटी, वायू व पितत दूर होते.
आंब्याचे अती सेवन करणे हे हितावह नाही. कारण त्यामुळे अपचन होते. जर अपचन झाले तर पाण्या बरोबर सुंठेचे चूर्ण घेतल्याने फायदा होतो.
गोड आंब्याच्या रसात जीवनसत्व “ए “ व “सी” खूप प्रमाणात असते. जीवनसत्व “ए” जंतुनाशक असते. तर “सी” त्वचारोगहारक असते. कच्या कैरीत सायट्रिक व मोलिक असीड असते.