आवळा : आवळा हे फळ आपल्या भारतात श्रेष्ठ मानले जाते. त्याच्या सेवनाने आपले बरेच रोग बरे होण्यास मद्द होते. त्याचे औषधी गुणधर्म बरेच आहेत. आवळ्यामध्ये “सी” जीवनसत्व व लोह भरपूर आहे. त्यामुळे आवळ्याचे सेवन करणे चांगले आहे.
आवळे हे साधारणपणे जानेवारी-फेब्रुवारी मध्ये येतात. आवळेहे साधरणपणे सुपारीच्या आकार एव्ह्डे असतात. त्यामध्ये दोन प्रकार आहेत. एक पांढरे आवळे व दुसरे रान आवळे. कोणत्याही ऋतू मध्ये आवळ्याचे सेवन करू शकतो. आयुर्वेदमध्ये आवळ्याला जास्त महत्व दिले आहे.
आवळ्यापासून छुंदा, मुरंबा बनवता येतो. छुंदा, मुरंबा जितका जुना तितका तो औषधी व गुणकारी असतो. आवळ्यापासून चवनप्राष बनवतात ते किती गुणकारी आहे हे आपल्याला माहीत आहे. तसेच हिरडा, बेहडा व आवळा समप्रमाणात घेवून त्यापासून त्रिफळाचूर्ण बनवतात ते किती गुणकारी आहे हे आयुर्वेदात सांगितले आहेच. त्रिफळाचूर्णचे सेवन केल्याने कफ, आपले पोट , कोड, पित्तामुळे जो त्रास होतो तो त्रास कमी होतो व डोळयांन साठी पण उपयुत्त आहे. तसेच आपल्या जेवणात रुची उत्पन्न करते. आवळाहा शीतवीर्य असल्याने तो रक्तातील अतिरिक्त उष्णता व त्याची तीव्रता कमी करतो व रक्तातील विषद्रवे कमी करून रक्त शुद्ध करण्यास मद्दत करतो. रोज सकाळी अनोश्या पोटी आवळ्याचा रस घेतल्यास शरीर सुधृद होते.
ताजे, पिकलेले मोठे आवळे एक किलो घेवून त्याला स्टीलच्या काटेचमच्याने टोचे मारून चुन्याच्या ४-५ तास ठेवावे व मग काढून दोन लिटर उकळत्या पाण्यात घालून थोडे वाफवून पाण्यातून काढून कापडाने पुसून कोरडे करावे. दोन किलो साखर घेवून त्याचा घट्ट पाक बनवावा व त्यामध्ये आवळे घालावेत. आवळ्याचा मुरंबा तयार झाला हा मुरंबा २-३ वर्ष टिकतो. ज्या लोकांचे केस गळण्याचे प्रमाण जास्त आहे त्यानी रोज सकाळी व संध्याकाळी आवळ्याच्या मुरंब्याचे सेवन करावे. तसेच हा मुरंबा शरीरातले पिक्त दूर करतो.