संत्रे : संत्रे हे सर्वाना आवडते ते किती गुणकारी आहे ते आपण बघूया. संत्रे हे दिसायला छान असते, स्वादाने आंबट-गोड, मधुर, व स्पर्शाने शीतल असे असते. संत्र्याचे दुसरे नाव नारंगी असेही आहे. English version of the saame article can be found – Here.
आपल्या इथे नागपूरची संत्री प्रसिद्ध आहे कारण संत्र्याला जसे उष्ण हवामान लागते ते नागपूरला आहे. त्यामुळे तेथील संत्री प्रसिद्ध आहेत.
संत्री ही साधरण पणे वर्षभर मिळतात. त्याचा रस मधुर, आंबट=गोड व गुणकारी असतो.त्याचा रस दाह व अरुची दूर करणारा असतो. त्यापासून रक्त शुद्धी होते व भूक लागते व पचनशक्ती वाढते. गरमीच्या सीझन मध्ये ह्याचे सरबत उपयुक्त आहे. उपासामध्ये संत्रे खावे त्याने शक्ती मिळते. संत्र्याचा रस तापामध्ये खूप फायदेशीर असतो. तापात ७-८ संत्री खाल्ली तरी त्याचे दुषपरिणाम होत नाही. वाढलेला रक्त दाब कमी होतो. तसेच तो पचण्या हलका असतो. आजारी माणसाला संत्री खायला दिल्याने खूप फायदा होतो. डोळ्यात वाढलेली उष्णता दूर होते. बेचेनी दूर होते. व मेंदू शांत रहातो जठराची व आतड्याची शुद्धी करण्यासाठी संत्री उपयुक्त असतात. व आवयांची पचनशक्ती वाढते.
संत्र्याच्या रसात उतेजक व पोषक गुण आहेत. रात्री झोपण्या पूर्वी व सकाळी अनोश्या पोटी संत्रे रस घेतल्यास जुलाब बंद होतात.दुध पचते व मुल निरोगी बनते.
चेहऱ्यावर संत्र्याची साले घासल्याने तोंडावरच्या तारुण्य पटीका नष्ट होतात.
आंबट संत्री खाऊ नयेत त्याने सर्दी, खोकला व पीत होते. संत्री जास्त खाणे हितावह नसते. जर सर्दी झाली असेल तर संत्र्याचा रस चिनीमातीच्या प्याल्यात थोडा गरम करून घ्यावा. त्याने फायदा होतो.
संत्र्या मध्ये जीवन सत्व ‘ए”, ‘बी” व “सी” असते. त्यात लोह भरपूर प्रमाणात असते. संधीवात सारख्या रोगात संत्री हे रामबाण समजली जातात. सांधे दुखणे, हाता पायांत कळा येणे यामंध्ये संत्री फायदेशीर आहेत. आपली त्वचा चांगली होते,