नारळ : नारळ हे फळ आपल्या सर्वांना माहीत आहे. ह्या फळाचा उपयोग खाण्यासाठी व धार्मिक कार्यासाठी केला जातो. नारळाच्या खोबऱ्याच्या सेवनाने आपले शरीर धस्ट-पुस्ट बनते. नारळाच्या खोबऱ्या पासून बरेच पदार्थ बनवले जातात. नारळापासून मिठाया खूप छान बनतात.
नारळाचे पाणी पौस्टिक आहे. ते खूप मधुर व स्वादिस्ट असते. त्यालाच शहाळ्याचे पाणी म्हणतात. नारळाच्या खोबऱ्या पासून तेल काढले जाते. त्याचा उपयोग आपण खाण्यासाठी व तळण्यासाठी व डोक्याला लावण्यासाठी करतो. खोबरेल तेलामुळे आपले केस चमकदार व मुलायम होतात. नारळाच्या तेलाचा उपयोग औषध बनवण्यासाठी केला जातो.
नारळ हा थंड, पचण्यास जड व आपले मूत्राशय स्वच्छ ठेवणारा, जुलाबरोधक, बलदायक, रक्तदोष दूर करणारा आहे. हृद्यरोग असणाऱ्यासाठी नारळ आरोग्य कारक आहे.
लहान मुलांना खोबरे व साखर रोज खायला घातल्याने त्याच्या शरीरावर चरबी वाढते. नारळाचे घट्ट दुध काढून ते उकळावे व त्याच्या तेलामध्ये मिरीपूड घालून आपल्या शरीराचा जो भाग जखडलेला असेल तेथे त्याने मालीश करावे त्यामुळे जखडलेला आवयव सुटा होतो. ओल्या नारळात लाइसीन व प्रोटीन घटक पुष्कळ प्रमाणात आहेत. तसेच खनिज क्षारही पुष्कळ प्रमाणात आहेत. ओल्या नारळात आपल्या आरोग्यासाठी लागणारी जीवनसत्वे भरपूर आहेत. पण सुक्या खोबऱ्यात त्याचे प्रमाण कमी आढळते. सुके खोबरे उष्णतावर्धक व पिक्त कारक आहे त्यामुळे खोकला होतो. त्यामुळे ओला नारळ किती उपयोगी आहे हे समजते.