मटकीची उसळ : मटकीची उसळ ही मुलांना शाळेत जातांना डब्यामध्ये चपाती बरोबर देता येते. मोड आलेल्या मटकीची उसळ मुलांना खूप आवडते. ह्या उसळीत लसणाची फोडणी घातलेली आहे त्यामुळे त्याची चव चांगली लागते. गरम मसाल्यामुळे खमंग लागते. आमसूल घातल्याने थोडासा आंबट पणा येतो तो पण छान लागतो. शेगदाणे घातल्याने दिसायला पण चागली दिसते. ओल्या नारळाचे खोबरे घातल्याने मधुर पण लागते.
मोड आलेल्या मटकीची उसळ गरम गरम भकरी बरोबर अप्रतीम लागते. मोड आलेली उसळ ही महाराष्ट्रातील लोकप्रिय आहे.
साहित्य : २ कप मोड आलेली मटकी, १ मध्यम आकाराचा कांदा (चिरून), १ टी स्पून लाल मिरची पावडर, १/२ टी स्पून गरम मसाला, १ टे स्पून शेंगदाणे, २ लहान आमसूल, १ टे स्पून नारळ (खोवून), कोथंबीर, मीठ चवीने
फोडणी साठी : १/२ टे स्पून तेल, १ टी स्पून मोहरी, १ टी स्पून जिरे, ५-६ लसूण पाकळ्या (ठेचून), ७-८ कडीपत्ता पाने (चिरून), १/४ टी स्पून हळद पावडर, १/४ टी स्पून हिंग
कृती : मोड आलेली मटकी धुवून घ्या. मग मटकी व शेंगदाणे ह्यामध्ये थोडे पाणी घालून कुकर मध्ये एक शिट्टी काढावी.
कढई मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरे, हिंग, लसूण, कडीपत्ता घालून मग त्यामध्ये कांदा घालून थोडा परतून घ्या व मग त्यामध्ये हळद, लाल मिरची पावडर, गरम मसाला, मीठ घालून उकडलेली मटकी घालावी व परतून घ्यावी जर हवे असेल तर थोडे पाणी घालून मंद विस्तवावर ५ मिनिट शिजवून घ्या. मग त्यामध्ये खोवलेले नारळाचे खोबरे, कोथंबीर, आमसूल घालून मिक्स करावी.
गरम गरम भकरी किंवा चपाती बरोबर सर्व्ह करावी.
टीप : मोड आलेल्या मटकी करण्याच्या आगोदर जर त्याला एक शिट्टी काढली तर उसळ पटकन होते. मोड आलेल्या मटकीची उसळ लोखंडी तव्यावर बनवलेली खूप चविस्ट लागते.