केळी : केळी ही खूप पौस्टिक आहेत. व ती सर्वांना आवडतात. त्याची औषधी गुणधर्म काय आहेत ते बघू या.
केळ्यामध्ये बाकीच्या फळांच्या पेक्षा कार्बोहायड्रेट्स जास्त असते. त्यामध्ये “ए”, “बी”, “सी”. “डी”, “इ” जीवनसत्वे आहते. तसेच आपल्या शरीराला लागणारे तांबे, लोह, सोडीयम ही खनिजद्रवे पण आहेत. त्यामध्ये हाडाची रचना कायम ठेवण्यात येणारे कँलशीयम असते. लहान मुलांना रोज केळे खायला द्यावे. त्याने त्याच्या शरीराचा चांगला विवस होते. व त्याची हाडे बळकट होतात. केळीही शीत आहेत ते शरीराला धष्टपुष्ट बनवतात.
कच्या केळीन पासून भाजी बनवतात, पण कच्ची केळी पचायला जड असतात. केळफुलाची पण भाजी बनवली जाते ती पण चांगली लागते. नेहमी पिकलेले केळे खावे. तसेच संध्याकाळी केळे सेवन केल्याने त्याचा शरीराला जास्त चांगला उपयोग होतो.केळ्यामध्ये ग्लुकोज असते त्यामुळे केळी गोड लागतात. पिकलेली केळी स्त्रियांनी खावी ती त्यांना खूप फायदेशीर असतात. लहान मुलांना दुध, केळ व थोडी साखर घालून खायला द्यावे त्यामुळे त्यांना शक्ती येते. व जर ते दुध पीत नसतील तर असे करून द्यावे.
जास्ती करून रात्री जेवणानंतर केळे खावे त्यामुळे पचन पण चांगले होते व दुसर्या दिवशी पोटपण साफ होते. जर सर्दी झाली असेल तर केळे खावू नये. एकदम पिकलेली व काळी पडलेली केळी खावू नये. केळे खाल्यावर पाणी कधी पिऊ नये कारण त्यामुळे सर्दी होऊ शकते.