मटकी : मटकी म्हंटले की लहान मुलांना त्याची उसळ खूप आवडते. मोड आलेल्या मटकीची उसळ ही पौस्टिक आहे.
मटकी ही थोडी रुक्ष जुलाबत गुणकारी, कफ व पित्तनाशक, थंड, थोडी वायुकारक, आहे. तसेच मटकी ही ताप, रक्तपित्त या रोगामध्ये गुणकारी आहे. जेव्हा शौचाच्या वेळी रक्त पडत असेल तेव्हा मटकी वाफवून त्यामध्ये कांदा किसून घालावा व त्याचे सेवन करणे हितकारक आहे. मटकीमध्ये लीसीथीन हे आहे ते आपल्या मेंदु शी निगडीत आहे.
मटकी पासून बरेच पदार्थ बनवले जातात. मोड आलेली मटकी आपल्या तब्येतीला चांगली आहे. महाराष्ट्रामध्ये मोड आलेल्या मटकी पासून मटकीचे सलाड, उसळ, मिसळ, गोड्या मसाल्याची उसळ, पापड बनवतात व ते खूप प्रसिद्ध पण आहेत. गुजरात मध्ये मटकी पासून मठीया, फाफडा व पापड बनवतात. हे मठीया नाश्त्याला बनवले जातात.
मोड आलेली मटकी मीठ, हळद घालून उकडून त्यावर थोडे लिंबू पिळून पण खूप छान लागते. आजकालच्या युगात हायब्रीड मटकी मिळते पण आपली गावठी मटकी चवीला खूप छान लागते. मटकी की नेहमी भकरी बरोबर चांगली लागते. मटकीच्या रशा बरोबर गरम गरम भात पण छान लागतो.
टीप : मटकीला मोड आणायचे असतील तर मटकी ७-८ तास पाण्यात भिजत घालावी जर आपल्याला दुपारच्या जेवणात मोड आलेली मटकी करायची असेल तर आधल्या दिवशी सकाळी मटकी पाण्यात भिजत घालावी रात्री त्याचे पाणी काढून टाकावे मग दुसऱ्या दिवशी परंत मटकीला सुंदर मोड येतात.