जायफळ (Nutmeg) : जायफळ हे आपल्याला माहीत आहेच. मीठई बनवण्यासाठी वापरले जाते कारण ते सुगंधी आहे. तसेच ते औषधी पण आहे.
जायफळ हे सुगंधी उत्तेजक, निद्राप्रद पाचक आहे. कॉलरा, अतिसार, डोकेदुखी, नेत्रपीडा यामध्ये जायफळ हे उपयोगी आहे. जायफळ हे वातहारक व पौस्टिक आहे. लहान मुलांना जी गुटी देतात त्यामध्ये जायफळ वापरले जाते.
जायफळ हे औषधी आहे त्यामुळे घरात जर लहान मुले असतील तर घरात नेहमी जायफळ ठेवावे. जायफळा पासून तेल सुद्धा बनवले जाते. त्या तेलाचा उपयोग जर संधीवात असेल तर वापरले जाते. त्यामुळे खूप आराम मिळतो.
जायफळ हे कडवट व गरम आहे. पण त्याच्या वापराने रुची निर्माण होते. जुलाबा मध्ये तर ते खूपच गुणकारी आहे. तसेच त्वचेचा काळपटपणा खोकला, सर्दी व हृदय रोग दूर करते.
जायफळ हे दुधामध्ये घेतल्याने दुध स्वादिस्ट बनते. जायफळ व सुठ साजूक तुपामध्ये उगाळून लहान मुलांना चाटायला दिल्यामुळे सर्दी कमी होवून जुलाब पण थांबतात. जायफळाचे चूर्ण पाण्याबरोबर घेतल्याने झोप चांगली येते. जायफळ उगाळून त्याचा लेप कपाळावर लावल्याने डोके दुखी थांबते. जायफलाच्या तेलाचा बोळा दातात ठेवल्यास दातातील कीड नष्ट होते. व दात दुखणे थांबते.
जायफळाचा वापर अती प्रमाणात केला तर डोक्यावर मादक परिणाम होतो, चक्कर येते, वेड्याची लहर येते. सारखे जायफळ वापरल्याने उष्णता निर्माण होते. त्यामुळे त्याचा अतिरिक्त वापर करणे योग्य नाही.