हळद [ Turmeric] : हळद ही सर्वांना माहीत आहे कारण की हळद ही घरगुती उपचारासाठी व ती आपल्या जेवणात सारखी वापरली जाते. हळदी मुळे आपल्या जेवणाला छान रंग येतो. व पदार्थाला चवपण येते.
हळद ही खूप औषधी आहे. तिच्या सेवनाने आपल्याला काही नुकसान नाही उलट फायदाच होतो. समजा आपल्याला कफ वा पित्त झाले तर हळदीच्या सेवनाने सर्वात जास्त फायदा होतो. हळदी मध्ये रक्त शुद्ध करण्याचा गुण आहे. तसेच आपल्या शरीराचा रंग ही उजळून निघतो. म्हणूनच लग्नाच्या वेळेस हळद लावण्याची प्रथा आहे.
हळदीच्या गरम दुधामुळे कफ व खोकला बरा होतो. लहान मुलांना, तरून, वृद्ध, स्त्रियांना तसेच गरोदर स्त्रियांना हळद दिल्याने नुकसान होत नाही उलट त्यांना ती फायद्याची आहे.
हळद ही वातशामक आहे त्यामुळे ज्यांना थंडी वाजून ताप आला असेलतर गरम दुधात हळद व मिरे घालून दिल्याने ताप नाहीसा होतो. रात्री झोपतांना हळदीचे गरम दुध घेतले तर घसा बसला असेल तर बरा होतो.
हळद ही जंतूनाशक व विषहारक आहे त्यामुळे त्वचारोग, गळवे, जर मुका मार लागला असेलतर हळदीचा लेप लावतात. त्याने आराम वाटतो. जखम झालेल्या ठिकाणी हळदीची पूड दाबून धरली असता जखमेतून निघणारे रक्त बंद होते. व जखम लवकर भरून येते.
गरम दुधात थोडे मीठ, गुळ घालून लहान मुलांना दिले तर सर्दी, कफ व श्वास चढणे हे रोग बरे होतात.