गुळ – Jaggery : गुळ हा आपल्या सर्वांचा परिचयाचा आहे व गुळाच्या सेवनाने त्याचे किती फायदे आहेत ते सुद्धा आपल्याला माहीत करून घ्यायला पाहिजेत. आज कालच्या युगाध्ये गुळा आयवजी साखरेचे वापराचे प्रमाण वाढले आहे. गुळ हा आपल्या शरीराला खूप फायदेशीर आहे. गुळ हा आपल्या आहारातील एक आवश्यक घटक आहे.
आपल्याला माहीत आहेच की उसाच्या रसा पासून गुळ बनवला जातो. गुळामध्ये सर्व खनिज द्रव्ये व क्षार आहेत जे आपल्या शरीराला उपयुक्त आहेत.
गुळापासून आपण विविध गोड पदार्थ बनवतो. उदा. शिरा, लापशी, खीर, मोदक, पुरणपोळी, गुळपोळी, आमटी ई. त्यामुळे पदार्थाला चव छान येते.
अती श्रम केले की आपल्याला थकवा येतो जर त्यावेळेस गुळ खाल्लातर थकवा लगेच कमी होतो. जे लोक कष्टाचे काम करतात त्यांनी गुळ जरूर खावा. नव्या गुळा पेक्षा जुना गुळ जास्त फायदेशीर असतो कारण की जुना गुळ पचनास हलका असतो. व साखर पचायला जड असते. गुळामध्ये द्राक्षशर्करा असते ते आपल्या रक्तात लगेच मिसळले जाते.
सर्दी झाली असता दुध, हळद व गुळ उकळून गरम गरम घेतला जातो. आले व गुळ घेतल्याने कफ कमी होतो. गुळाच्या सेवनाने भूक लागते. व पावसाळ्यात सर्दी होत नाही.