मुले सुट्टीत किंवा रिकाम्या वेळात कंटाळवाणी होतात मग काय करायचे हा प्रश्न असतो. रिकाम्या वेळात मुले जेल कॅनडल-Jelly Candles (मेणबत्ती) सहज बनवू शकतात. ह्याला लागणारे साहित्य बाजारात सहजपणे उपलब्ध आहे. ह्या कॅनडल मुलांना बनवायला खूप आवडेल तसेच त्यांना त्याच्या मित्रांना गिफ्ट म्हणून सुद्धा देता येतील.
साहित्य :
१०० ग्राम जेली
मार्बलचे तुकडे रंगीत
४ जेली ग्लास
४ कॉड (वाती साठी)
क्रीस्टलचे तुकडे
मोती
रंग
रंगीत रीबन
कृती : प्रथम जेली स्टीलच्या छोट्या घमेल्यात मंद विस्तवावर २-३ मिनिट गरम करून घ्या. (गरम करतांना विस्तव मोठा ठेवू नये नाहीतर एकदम भडका होईल) नंतर ३-४ मिनिट बाजूला थंड करायला ठेवा.
एक जेली ग्लास घेवून त्यामध्ये प्रथम कॉड ठेवून मार्बलचे तुकडे, मोती घालावे मग वरतून जेली ओतावी. ग्लासला पाहिजे तसे डेकोरेट करावे किंवा रीबीन वापरून सुद्धा सजवता येते.
काही प्रकारच्या जेली कॅनडल बनवता येतील त्यासाठी लागणारे सामान
मार्बल-क्रिस्टल कॅनडल
मोती वापरून कॅनडल
रंगीत जेली कॅनडल
मोती-क्रिस्टल कॅनडल
टेडी कॅनडल
मिकी कॅनडल
फिश पॉड
आपल्याला पाहिजे तशा आपली कल्पना शक्ती वापरून कॅनडल बनवता येतात.
The English language version of the homemade Jelly candles preparation is published in this – Article
The Marathi video on making these Jel/ Jelly Candles at home can be seen on our YouTube Channel – https://www.youtube.com/watch?v=gewtAv-Rbb4