ओवा : ओवा [Ajwain in Hindi and Carom in English ]म्हणजेच अजवाईन होय. ओवा हा खूप औषधी आहे. ओव्याचे औषधी गुणधर्म काय आहेत ते आपण बघूया. ओवा हा गरम, पोटातील वदना कमी करणारा आहे. जर पोटामध्ये अजीर्ण झाले, जुलाब होत असतील तर ओवा गुणकारी आहे.
ओवा हा औषधा म्हणून वापरतात तसेच जेवणामध्ये सुद्धा त्याचा वापर केला जातो. बटाटा भाजी बनवतांना त्याची भरड घातली जाते. पालक परोठा बनवतांना त्याची भरड घातली जाते. ओव्याच्या पानांची भाजी पण फार टेस्टी लागतात. गवारीची भाजी बनवतांना फोडणी मध्ये थोडा ओवा घालावा भाजी फार छान लागते.
ओवा थोडा गरम, तिखट, कडवट, पाचक, व रुची उत्पन्न करणारा आहे. जर अपचन. सर्दी, जुलाब व कफ झाला असेलतर ओवा गुणकारी आहे. सिधीवात असेलतर ओव्याचे तेल गुणकारी आहे.
बाळंतीणीला ओवा मुद्दाम खायला देतात. त्यामुळे पचनशक्ती चांगली होते. भूक चांगली लागते. व ताप येत असेलतर बरा होतो.
ओवा थोडा भरडून गरम पाण्याबरोबर घेतल्यामुळे सर्दी व खोकला बरा होतो व श्वासाचा जोर शांत होतो. ओव्याची पूड खावून त्यावर गरम पाणी पिल्याने पोट दुखी थांबते. उचकी येत असेल तर ओवा चावून खावा.
ओवा नेहमी नवा वापरावा. जुना ओवा असेलतर त्यातील तेलाचा अंश उडून जातो व त्या ओव्याचा फारसा उपयोग होत नाही.