रांगोळी (Rangoli) : आपल्या अंगणात रांगोळी काढणे हा प्रकार फक्त महाराष्ट्रात नाही तर सगळ्या प्रांतात घरासमोर रांगोळी काढली जाते. रांगोळी काढणे हे आपल्या भारतीय संकृतीत आहे. रोज सकाळी घरासमोरील परिसर झाडून सडा घालून रांगोळी काढावी ही आपली संकृती आहे. तसेच त्यामुळे असे समजले जातेकी आपल्या घराची कळा आंगणावरून ठरते म्हणजे असे की आपले घर किती स्वच्छ आहे, प्रसन्न आहे आणि किती सुंदर आहे. आपल्या घरासमोरील अंगणात सडा घालून काढलेल्या रांगोळी वरून घराची स्तिथी समजते.
खर म्हणजे आपण सरळ किंवा आडवे ठिपके घालून ते ठिपके रेषा काढून एकमेकाला जोडतो ह्या मागे काही कारणे आहेत. कारण त्या पासून आकृती निर्माण होते त्या आकृतीचा काहीना काही अर्थ निर्माण होतो. त्यापासून चंद्र, सूर्य, चांदणी, शंख, चक्र अश्या आकृत्या निर्माण होतात, त्याचा अर्थ असाकी शीतलता, गतिमानता, बुद्धी, समृधी हा आहे. तसेच त्या घरातील गृहलक्ष्मीचे अंतकरण व सौदर्याची अनुभूती समजते.
प्रतेक सणाला म्हणजे दसरा, दिवाळी, संक्रांत, पाडव्याला आपल्या घरासमोर रांगोळी काढायची पद्धत ही फार वर्षापासून चालत आली आहे. तसेच प्रतेक शुभकार्य, काही कार्यक्रम, पूजेच्या वेळी चौरंगाच्या भोवती, ताटा भोवती, तुळशी वृंदावनच्या समोर सुद्धा रांगोळी काढायची पद्धत आहे. रांगोळी काढण्या मागे काही कारणे आहेत.
आपण उंबरठ्यावर रांगोळी काढतो त्याचे कारण आपल्या घरात अशुभ शक्ती येऊ शकत नाही व आपल्या घरातील शुभ शक्ती घराबाहेर पडत नाही. अंगणात काढलेली रांगोळी मुळे आपले आंगण सुंदर दिसते व आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करून त्याचे मन प्रफुलीत करते.
पण आता काळ बदलला आहे जसे गावाकडे घरासमोर मोठे अंगण, अंगणात तुळसी वृंदावन असते आता शहरात तसे नाही कारण की शहरात बिल्डिंग मधील छोटी घरे व घरा समोर जागापण कमी असते. त्यामुळे मनासारखी रांगोळी सुद्धा काढता येत नाही म्हणून आता बाजारात रेडीमेड वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या मिळतात. आपले काम झाले की परत उचलून व्यवस्थित ठेवता येतात.
पण हाताने काढलेल्या रांगोळीची हौस वेगळीच असते. रांगोळी काढण्या अगोदर झाडून पुसून लगेच रांगोळी काढावी म्हणजे जागा ओली असतांना रांगोळी छान बसते. आपण ठिपक्याची, देवाच्या चित्राची, फुलांची, धान्याची रांगोळी काढू शकतो.
स्वस्तिक : रांगोळी काढल्यावर नेहमी बाजूला स्वस्तिक काढावे. त्यामध्ये सर्व देवतांच्या शुभकामना असतात. स्वस्तिक म्हणजे भावना, शोभा, प्रेम व सौदर्य होय. व स्वस्तिकच्या चार भुजा म्हणजे विष्णूचे चार हात आणी मध्य बिंदू म्हणजे नारायणाचे नाभिकमल म्हणून हे सर्जनात्मक आहे. यालाच सूर्याचे प्रतीक सुद्धा मानतात.
शंख : शंख हे आपल्याकडे शुभ मानतात. शुभ कार्याच्या वेळेस शंख वाजवून सुरवात करतात. तसेच शंखाची रांगोळी काढावी. शंखाच्या मुल भागी चंद्र, उदरात वरुण, पाठीवर प्रजापती आणि अग्रभागी गंगा, सरस्वती ह्या देवांचा वास आहे.
चक्र : चक्र म्हणजे सूर्याचे प्रतीक आहे.
कमळ : कमळ हे आपल्या भारतीय संकृतीचे प्रतीक आहे. कमळ म्हणजे शोभा, वैभव होय.
गदा : गदा हे बुद्धीचे प्रतीक आहे. ह्याची काढलेली रांगोळी सुख समृद्धीचे प्रतीक आहे.