खमंग चकली भाजणी-Khamang Chakli Bhajani : खमंग चकलीची भाजणी घरी कशी बनवायची. दिवाळी फराळ म्हंटले की लाडू, चिवडा, शेव, कारंजी बरोबर चकली ही हवीच. चकलीची भाजणी बनवायला अगदी सोपी आहे. चकलीची भाजणी ही बाजारात किती महागात मिळते. जर आपण चकलीची भाजणी घरीच बनवली तर किती छान होईल, तसेच कमी किमतीत घरी भरपूर चकल्या बनवता येतात. ही भाजणी बनवतांना तांदूळ, चणाडाळ, उडीद डाळ, जिरे व मेथी दाणे वापरले आहेत. जिरे व मेथी दाण्यामुळे चकली छान खमंग व स्वादिस्ट लागते. चकली ही सर्वांची अगदी खूप आवडती असते. चकली भाजणी बनवतांना खालील दिलेले साहित्य वापरावे व भाजणी कशी बनवायची ते बघू या.
Chakli Bhajani-चकली भाजणी बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट
वाढणी: १ किलोग्राम भाजणी बनते.
साहित्य :
४ कप तांदूळ
२ कप चणाडाळ
१ कप उडीदडाळ
१/२ कप जिरे
१/२ कप जाडे पोहे
१ टी स्पून मेथी दाणे
कृती : प्रथम तांदूळ निवडून घ्या. डाळीमध्ये डोळे असतील तर ते काढून टाका.
तांदूळ, चणाडाळ, उडीदडाळ वेगवेगळी धुवून घ्या. मग एका स्वच्छ मलमलच्या कापडावर तांदूळ, चणाडाळ व उडीदडाळ वेगवेगळी पसरवून ठेवा. डाळी व तांदूळ सावलीतच पसरवून ठेवा कमीतकमी ७-८ तास तरी तस्याच पसरवून ठेवा.
कढई गरम करून त्यामध्ये डाळी व तांदूळ भाजून घ्या व एका पेपरवर पसरवून ठेवा.
पोहे, जिरे व मेथी दाणे वेगवेगळे भाजून घ्या.
थंड झाल्यावर भाजणी डाळीवर बारीक दळून आणा.
टीप : तांदूळ वापरतांना बुटका तांदूळ वापरावा. तांदूळ व डाळी धुवून घ्या. पोहे, जिरे व मेथ्या धुवायच्या नाही ते कच्चेच भाजून घ्यायचे. भाजणी दळून आणल्यावर घट्ट झाकणाच्या डब्यात ठेवावी.
चकली बनवतांना लोणी, तेल किंवा तुपाचे मोहन घ्यावे म्हणजे चकली छान खुशखुशीत होते.
पीठ मळताना मिरची पावडर फार लाल रंगाची वापरू नये नाहीतर चकलीचा रंग बदलतो.
पीठ भिजवताना गरम पाणी वापरावे. पीठ खूप घट्ट किंवा सैल मलू नये नाहीतर चकली कडकडीत होते किंवा मऊ पडते किंवा तळताना विरघळते.
चकली बनवतांना मळलेले पीठ थोडे थोडे घेवून पाण्याच्या हात लावून चांगले मळून घ्यावे. व एका प्लास्टिकच्या पेपरवर चकल्या घालाव्यात.
चकली तळताना तेल आगोदर नीट तापले आहे की नाही ते बघावे, तेल तापले की चकली सोडताना विस्तव मोठा ठेवावा चकली तेलात सोडली की लगेच विस्तव मंद करावा व दोन्ही बाजूनी चकली छान तळून घ्यावी.
चकली तळल्यावर चकली एका प्लेटमध्ये काढून मग चाळणी वर एक मोठा पेपर ठेवून मग गरम चकल्या त्या पेपरवर ठेवाव्या थंड झाल्यावर मग घट्ट झाकणाच्या जर्मनच्या डब्यात ठेवाव्यात.
The English language version of the Chakli Atta preparation method is given in this – Article