बेसन लाडू – चना डाळीच्या पीठाचे लाडू : बेसन लाडू बीन पाकचा आहे. बनवायला एकदम सोपा आहे. महाराष्ट्रा तील लोकांचे बेसन लाडू म्हणजे अगदी आवडतीचे व लोकप्रिय आहेत, बेसन लाडू बनवतांना थोडा रवा घातला तर चव फार छान लागते. बेसनाचा लाडू हा दिवाळीच्या फराळातील एक महत्वाचा पदार्थ आहे.
बेसन लाडू बनवण्यासाठी वेळ: ९० मिनिट
वाढणी: ३० मध्यम आकाराचे लाडू
साहित्य :
३ १/२ कप बेसन
१/२ कप बारीक रवा
१ कप तूप (अर्धे साजूक आणि अर्धे वनस्पती तूप)
२ १/२ कप पिठीसाखर, १ कप दुध, २ टी स्पून वेलचीपूड
थोडे किसमिस
थोडे काजू-बदाम तुकडे करून
कृती : १/२ कप वनस्पती तूप गरम करून त्यामध्ये बेसन चांगले खमंग भाजून घ्या व बाजूला ठेवा. बारीक रवा चांगला गुलाबी रंगावर भाजून घ्या. बेसन व रवा मिक्स करून परत थोडे परतून घ्या व त्यामध्ये हळूहळू दुध घालून मिक्स करून परत बेसन थोडे परतून घ्या. जर गुठळ्या झाल्या असतील तर बेसन थंड करून मग मिक्सर मधून काढून घ्या व परत बेसन थोडे परतून घ्या. थंड झाल्यावर त्यामध्ये पिठीसाखर, वेलचीपूड, किसमिस, काजू-बदाम थोडे कुटून घाला व मिक्स करून घ्या. लाडू वळताना थोडे थोडे बेसन व थोडे तूप घालून चांगले मळून मग लाडू वळून घ्या. असे सर्व लाडू बनवून घ्या.
The English language version of the Besan/Chana Dale Flour Ladoo is published in this – Article