दिवाळी फराळासाठी शेव कशी बनवावी : दिवाळी ही महाराष्ट्रात खूप धूमधडाक्यात साजरी करतात. दिवाळी फराळ म्हंटले की महाराष्ट्राततील महिलांचा त्यामध्ये हातकंडा आहे. शेव म्हंटले की दीपावली फराळात पाहिजेच त्याशिवाय आपला दिवाळी फराळ कसा पूर्ण होणार. शेव घरी कशी बनवायची. तसेच चांगली शेव कशी बनवायची त्यासाठी काही टिप्स आहेत.
चणाडाळ ही ताजी वापरावी. त्याला चांगले ऊन देवून मग डाळीवर डाळ घालून दळायला सांगावी.
शेव बनवण्याच्या आगोदर बेसन २-३ वेळा सपेटीच्या चाळणीने चाळून घ्यावे.
बेसन चाळून घेतांना लाल मिरची पावडर, लवंग पावडर, मीठ, धने-जिरे पावडर किंवा शेव मसाला घालावा व मग चाळून घ्यावे त्यामुळे शेव अगदी हलकी होते.
पीठ मळताना पीठ अगदी घट्ट किंवा अगदी सैल नसावे मध्यम असावे. त्यामुळे शेव अगदी कडक किंवा मऊ पडत नाही. पीठ चांगले मळून घ्यावे. पीठ फार वेळ आधी मळून ठेवू नये.
सोरयातून शेव पाडण्या आगोदर सोरया प्रथम आतून ओला करून तेलाचा हात लावावा म्हणजे पीठ चीटकत नाही व शेव चांगली बाहेर येते.
तेल चांगले गरम करून घ्यावे. शेव घालतांना विस्तव मोठा करावा व शेव घातलीकी लगेच विस्तव बारीक करावा.
शेव छान पिवळ्या रंगावर (गोल्डन यलो) तळावी. तळलेली शेव कागदावर ठेवावी थंड झाल्यावर घट्ट झाकणाच्या डब्यात ठेवावी.