शाही मलई कोफ्ता करी (Shahi Malai Kofta Curry) : शाही मलई कोफ्ता करी ही एक चवीस्ट करी आहे. ह्याला शाही म्हंटल कारण की ह्या मध्ये कोफ्त्यासाठी बटाटे, पनीर, चीज व काजू-बदाम वापरले आहे. तसेच ग्रेवी साठी टोमाटो, काजू, दही, मलई वापरली आहे. मलई कोफ्ता करी ही घरी पार्टीला करता येते. पनीर हे होम मेड म्हणजेच घरी बनवलेले आहे.
शाही मलई कोफ्ता करी बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य :
कोफ्तेसाठी :
४ मध्यम आकाराचे बटाटे
१/४ कप पनीर घरी बनवलेले
१/४ टी स्पून मिरे पावडर (जाडसर)
१ टे स्पून कॉर्नफ्लोर
१ टी स्पून मैदा
मीठ चवीने
तेल कोफ्ते तळण्यासाठी
कोफ्तामध्ये सारण भरण्यासाठी :
४ बदाम (तुकडे करून)
४ काजू (तुकडे करून)
१ चीज क्यूब (बारीक तुकडे करून)
थोडे मनुके
करी किंवा ग्रेव्ही साठी :
३ मोठे कांदे (थोडे उकडून)
२ मोठे टोमाटो (उकडून)
२ टे स्पून ओला नारळ (खोवून)
१ टे स्पून तेल
१/२ कप दही
१ टे स्पून आले-लसून पेस्ट
१ १/२ टी स्पून लाल मिरची पावडर (कश्मीरी)
१ टी स्पून गरम मसाला
१ टे स्पून काजू पावडर
१/४ टी स्पून हळद
१/४ कप फ्रेश क्रीम
मीठ चवीने
कृती : कोफ्ते बनवण्यासाठी : बटाटे उकडून, सोलून किसून घ्या. त्यामध्ये किसलेले पनीर, कॉर्नफ्लोर, मिरे पावडर, मैदा व मीठ घालून चांगले मिक्स करून त्याचे छोटे गोळे बनवून घ्या.
सारणासाठी : चीजचे तुकडे करा, काजू-बदामचे तुकडे करा व मनुके घ्या.
बनवलेल्या छोट्या गोळ्या मध्ये चीजचे तुकडा, काजू-बदाम तुकडा व एक मनुका ठेवून गोळा बंद करा.
कढई मध्ये तेल गरम करून त्यामध्ये गोळे ब्राऊन रंगावर तळून घ्या.
करी किंवा ग्रेवी बनवण्यासाठी : कांदे सोलून थोडे उकडून घ्या. मिक्सरमध्ये कांदे, आले-लसूण व ओला नारळ मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
टोमाटो उकडून त्याची प्युरी बनवून घ्या. काजू पावडर करून घ्या.
एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा पेस्ट घालून थोडी परतून घ्या. त्यामध्ये टोमाटो पेस्ट घालून थोडी परतून घ्या. दही, लाल मिरची पावडर, हळद, मीठ घालून थोडे परतून घ्या मग त्यामध्ये १ १/२ कप गरम पाणी घालून उकळी आणून फ्रेश क्रीम, काजू पावडर घालून एक उकळी आणा.
गरम गरम सर्व्ह करा व वाढतांना त्यामध्ये गोळे घाला व पराठ्या बरोबर सर्व्ह करा.
The English language version of the Shahi Malai Kofta Curry is given in this – Article