सुगंधी उटणे Sugandhi Utane for Diwali Abhyanga Snan: दिवाळी आली की महिला अभ्यंग स्नाना साठी दिवाळीच्या फराळाच्या सामाना बरोबरच सुगंधी उटणे (उबटन), सुगंधी साबण खरेदी करतात. दिवाळी मध्ये सुगंधी उटन्याला फार महत्व आहे. हे उटणे आपल्या चेहऱ्याला लावण्यासाठी पण उपयोगी आहे. सुगंधी उटणे लावतांना त्यामध्ये दुध व गुलाबजल घालून मिक्स करून लावावे. उटन्याने आपली कांती फार छान होते तसेच दुध व गुलाबजल घातल्याने कांती मुलायम रहाते. आपला चेहरा स्वच्छ होतो. अंगाला चांगला सुंगध येतो. शरीराची मृत त्वचा ताजी होते.
आमच्या लहानपणी अंगणामध्ये मोठा बंब पेटवला जायचा आमची आई मुलांना पाटावर बसवून उटणे लावून छान गरम गरम पाण्याने आंघोळ घालायची त्यामुळे दिवसभर ताजे तवाने वाटायचे. मग देवाची पूजा करायची. अभ्यंग स्नानाची मजाच काही निराळी असायची.
झटपट उटणे घरी कसे बनवायचे ते आपण पाहू.
साहित्य :
२५० ग्राम (१/४ किलो) मसूर डाळ पीठ
२५ ग्राम आवळकाठी
२५ ग्राम सरीवा
२५ ग्राम वाळा
२५ ग्राम नागर मोथा
२५ ग्राम जेष्टमध
२५ ग्राम सुगंधी कचोरा
५ ग्राम आंबेहळद
२५ ग्राम तुलसी पावडर
२५ ग्राम मंजीस्ट
५ ग्राम कापूर
कृती : वरील सर्व साहित्य चांगले मिक्स करून घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवावे.