द्राक्षाचे औषधी गुणधर्म: द्राक्ष हे फळ सर्वांना आवडते व ते औषधी सुद्धा आहे. द्राक्षे ही स्वादाने मधुर असतात.
द्राक्षाचे दोन प्रकार आहेत. काळी द्राक्षे व पांढरी द्राक्षे होय. पांढरी द्राक्षे फार मधुर असतात. काळी द्राक्षे ही सर्व प्रकृतीच्या लोकांना फायदेशीर असतात तसेच ती गुणकारी पण आहते. काळी द्राक्षे ही औषध बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरली जातात. आपल्याला बेदाणे, मनुके व किसमिस माहीत आहेच जे की द्राक्षाना सुकवून बनवले जातात.
द्राक्षे ही पिक्त्तशामक व व रक्तवर्धक आहेत. द्राक्षे ही लहान मुलांना, तरुणांना, वृद्ध, गरोदर व बाळंत स्त्रीयांना गुणकारी आहेत. द्राक्षही कफ कारक आहेत त्यामुळे ती खाताना थोडेसे मीठ लावून खावी म्हणजे त्यामुळे कफ होत नाही.
ज्यांना वारंवार पीक्ताचा त्रास होतो त्यानी द्राक्षे रोज खावीत त्यामुळे पिक्त प्रकोप शांत होतो. उलटी होत असेल तर तीपण थांबते. द्राक्षे ही त्वचे साठी, डोळ्यासाठी, रक्त शुद्ध करण्यासाठी उपयोगी आहेत. द्राक्षाच्या सेवनाने सगळ्या तक्रारी दूर होतात.
द्राक्षा पासून तयार केलेल्या मनुका गुणकारी आहेत. जे अशक्त आहेत त्यानी रोज रात्री १/२ वाटी पाण्यात ६-७ मनुका भिजत घालून सकाळी कुस्करून पाणी गळून त्यात जिरे पावडर व साखर घालून खावीत.
द्राक्ष ही आंबट किवा कच्ची खाऊ नयेत नेहमी गोड व पिकलेली खावीत. अतिरिक्त प्रमाणात द्राक्षाचे सेवन केल्यास शरीर कृश बनते. द्राक्षे खाल्यामुळे स्त्रीयामधील मासिक पाळीचा त्रास दूर होतो. द्रक्ष्याच्या रसामुळे डोके दुखी दूर होते. त्यामध्ये जीवनसत्व “ए”, “बी” व “सी” तसेच लोह असते. द्राक्षेही पौस्टिक आहेत.