मीठाचे औषधी गुणधर्म (Salt): मीठ हे आपल्या सर्व्हाचे परिचयाचे आहे. मीठाशिवाय आपल्या जेवणाला चव नसते. मीठ हे आपल्या शरीराला आवशक आहे.
मीठ हे खारट असते. मिठाला गुजरातमध्ये मीठू असे म्हणतात तर हिंदी मध्ये सबरस असे म्हणतात. मीठाला सर्व रसांचा राजा असे म्हणतात. मिठा शिवाय सर्व मसाले व्यर्थ आहेत. म्हणूनच मिठाला मसाल्यांचा राजा म्हणतात.
जर आपण दीर्घकाळ मीठ सेवन केले नाहीतर अशक्तपणा येतो. मिठामुळे आपली हाडे मजबूत बनतात. मिठाचा उपयोग अन्न दीर्घकाळ टीकवण्यासाठी करतात. लोणी व मासे टीकवण्यासाठी मिठाचा उपयोग केला जातो.
मिठाचे काही प्रकार आहेत. सैंधव, शेंदोलोण, पांदेलोण हे होय. ह्या प्रकारांमध्ये सैंधव मीठ हे उत्तम मानले जाते. जेव्हा आहारामध्ये मीठ हे वर्ज केले जाते तेव्हा सैंधव मीठ घेता येते हे मीठ पाचक, रुचकर, हृदयविकारावर गुणकारी, डोळ्यांना चांगले आहे. पिक्त व कफावर ही हे गुणकारी आहे.
शेंदोलोण, पांदेलोण मीठ हे खाणीतून काढले जाते ते रेचक, खारट, तिखट, असते.
आपल्या आहारात नेहमी पांढरे स्वच्छ व चमकदार मीठ वापरावे. साधारणपणे खडे मीठ वापरावे. ते आपल्या आरोग्याच्या दृष्टीने गुणकारी आहे.
आपल्या आहारात योग्य प्रमाणात मीठ सेवन करणे हितावह आहे. कमी प्रमाणात मीठ घेतले तर अशक्तपणा येतो तसेच जास्त प्रमाणात मीठ सेवन म्हणजे विष सेवन केल्या सारखे आहे. आपण भाजी, आमटी, चटणी मध्ये मीठ घालतो कारण मिठामुळे त्याला चव येणार नाही. पण पापड, लोणचे ह्या पदार्थात मीठ जास्त असते. त्यामुळे हे पदार्थ जरा जपूनच खावे. मिठाच्या अती वापरामुळे शरीरात दोषच निर्माण होतात.
पण काही बाबतीत मीठ हे खूप गुणकारी आहे. सर्दी खोकला झाला तर गरम पाण्यात मीठ घालून त्याने गुळण्या केल्यावर त्याचा फायदाच होतो. त्याने गळ्याला शेक मिळतो. ज्यांना गळ्याला सूज आली असेल त्यांनी मिठाच्या गरम पाण्यानी गुळण्या कराव्यात. खूप खोकला येत असेलतर एक मिठाचा खडा रात्री झोपतांना तोंडात ठेवावा म्हणजे रात्री खोकला येत नाही.
काही जणांना पिक्ताचा त्रास होतो त्यानी दोन ग्लास पाण्यामध्ये १/२ टी स्पून मीठ घालून मिक्स करून पाणी प्यावे म्हणजे उलटी होवून उलटी वाटे कफ व पिक्त पडून जाते. त्यानंतर मग तूप भात खावा. रोज रात्री कोमट पाण्यात दोन चिमुट मीठ घालून प्याल्याने आतडी साफ होतात. पोट दुखीवर मीठ व ओवा मिक्स करून खाल्याने पोट दुखायचे थांबते. तसेच रोज सकाळी कोमट पाण्यात मीठ घालून सेवन केल्याने पोटातील कृमी निघून जातात.
मिठापासून जसे फायदे आहेत तसेच काही तोटे सुद्धा आहेत. तोटे म्हणजे अतिरिक्त प्रमाणात मीठ सेवन करून नये. त्यामुळे पचनशक्ती बिघडते.