महाराष्ट्र व महाराष्ट्रातील स्त्री: महाराष्ट्र म्हंटले की महाराष्ट्रातील लोक व त्याची संकृती ही सर्वत्र लोकप्रिय आहे. तसेच महाराष्ट्रीयन स्त्री म्हंटले की पूर्वीची पारंपारिक पोशाखातील, कपाळावर मोठे कुंकू, नाकात नथ, गळ्यात ठुशी, केसांचा खोपा व त्यावर चंद्र्कोराचा आकडा, पायात पैजण व मासोळ्या वगेरे. महाराष्ट्रतील मराठी भाषा ही फार छान आहे.
महाराष्ट्र म्हणजे महान राष्ट्र व मोठा प्रदेश होय. महाराष्ट्रमध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, अहमदनगर, औरंगाबाद, पुणे, सोलापूर, धुळे, जळगाव, नांदेड, नासिक, नागपूर, चंद्रपूर व मुंबई हे जिल्हे येतात.
महाराष्ट्रातील एक आकर्षण म्हणजे सातपुडाचे सृष्टी सौंदर्य होय तसेच येथील नद्या कृष्णा, गोदावरी, तापी, पूर्णा, चंद्रभागा, कोयना, मुळा, मुठा होय.
महाराष्ट्रातील किल्ले पुरंदर, रायगड, प्रतापगड, पन्हाळा, देवगिरी, सिंधुदुर्ग व औरंगाबाद येथील जग प्रसिद्ध लेण्या अजंठा व वेरूळ होय.
महाराष्ट्रातील लोकप्रिय तीर्थक्षेत्र म्हणजे देहू-तुकाराम महाराज, आळंदी-ज्ञनेश्वर महाराज, पंढरपूर-विठ्ठल रखुमाई, तुळजापूर- भवानीमाता, गाणगापूर-श्री दत्तात्रय, नासिक-वणीची देवी, कोल्हापूर- अंबाबाई, जग प्रसिद्ध शिरडी येथील साईबाबा व अष्टविनायक प्रसिद्ध आहे. तसेच संशोधन व प्रयोगशाळा आहेत, National Defense Academy, Tata Research Centre, Half keen Institute, National Chemical Laboratory.
महाराष्ट्रमध्ये मराठी वर्षआरंभ हे चैत्र महिन्या पासून चालू होते. नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे गुढीपाडवा ह्या दिवशी लोक घरासमोर गुढी उभारून हा सण साजरा करतात. हा दिवस म्हणजे साडेतीन मुहूर्ता पैकी एक मानला जातो. कोणतेही चांगले काम ह्या दिवशी चालू करता येते. ह्या दिवशी ब्रम्हदेवाची पूजा केली जाते कारण ह्याच दिवशी ब्रम्हदेवाने हे जग निर्माण केले आहे.
वट पौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा करून सात जन्म हाच पती मिळावा म्हणून प्रार्थना करते. श्रावण महिन्यातील प्रत्येक सण म्हणजे श्रावणी सोमवार, नागपंचमी, गोकुळ अष्टमी, भाद्रपद महिन्यातील गौरी-गणपती, अश्विन महिन्यातील घटस्थापना, विजयादशमी दसरा, दीपावली, पौष महिन्यातील मकर संक्रांत, फाल्गुन महिन्यातील होळी हे सण अगदी श्रद्धेने करते.
महाराष्ट्रमध्ये रांगोळीचे पण खूप महत्व आहे. घरासमोर सडा घालून रांगोळी काढायची तुळशीला पाणी घालायचे ही एक जुनी परंपरा आहे त्यामुळे कोणतीही वाईट नजर आपल्या घरावर पडत नाही असे म्हणतात. येथील महिलांचे एक महत्वाचे आकर्षण म्हणजे देवांची व्रत वैकल्ये. प्रतेक महिन्यामध्ये काहीना काही देवाची व्रते असतात ती व्रते महिला अगदी भाविकतेने व श्रद्धेनी करतात. आठवड्यातील उपवास करतात. आपल्या घराला व आपल्या कुटुंबाला कोणाची नजर लागू नये म्हणून साधे सोपे नियम पाळत असतात. आपल्या बाळाला कोणाची बाधा होऊ नये म्हणून बाळाच्या गळ्यात जिवती बांधतात त्यामुळे जिवती आपल्या बाळाचे रक्षण करते असे मानतात. तसेच श्रावण महिन्यात शुक्रवार ह्या दिवशी जिवतीचे चित्र भिंतीवर लावून त्याची पूजा केली जाते त्यामुळे जिवती आई आपल्या बाळाचे रक्षण करते असे मानतात. श्रावण महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी जिवतीला पुरणाचा नेवेद्य दाखवतात. म्हणजेच असे की महाराष्ट्रातील लोक ही धार्मिक वृतीची आहेत.
पण आजची महिला ही घर व नोकरी हे दोन्ही तारेवरच्या कसरती सारखे छान संभाळते.