आले औषधी गुणधर्म: आल्याचा आपण जेवण बनवतांना सरास वापर करत असतो. आले हे खूप गुणकारी आहे.
असे म्हणतात की जेवण करण्या अगोदर आल्याचा लहान तुकडा घेवून त्याला थोडेसे मीठ लाऊन सेवन केले तर भूक चांगली लागून तोंडाला रुची येते व पचन सुद्धा चांगले होते. तसेच आल्याच्या सेवनाने कफ. व वायूचे विकार बरे होतात.
आल्याचा उपयोग भाजी, आमटी, लोणचे व चाटण बनवण्यासाठी केला जातो. आले हे लहान मुलांन पासून अगदी वृघ माणसान परंत उपयोगी आहे.
आले हे उष्ण, तिखट, मधुर, रुक्ष, वायू व कफकारक आहे. पावसाळा व थंडीच्या ऋतूत आले हे जास्त हितावह आहे. आल्याच्या रसाबनवून ठेवा. चारपट साखर घेऊन त्याचा पाक करून त्यामध्ये आल्याचा रस घालून थोडेसे घट्ट शिजवून त्याचे सरबत बनवून हे सरबत पाण्यात घालून घेतल्याने पोटातील वायू जाऊन पोट साफ होते.
आल्याच्या रसात मध घालून सेवन केल्याने खोकला जाऊन श्वास विकारात फायदा होतो.
आल्याच्या रस व पाणी एक सारखे प्रमाण घेऊन ते रोज घेतल्याने ह्रदयरोग बरा होतो.
आल्याचा रस, लिंबाचा रस व मीठ एकत्र करून घेतल्याने मळमळणे थांबते व उलटी होत असेल तर तीपण थांबते.
असे आहे गुणकारी आले.