धन्याचे व कोथंबीरीचे औषधी गुणधर्म: धने हे आपल्या परिचयाचे आहेत. धने आपण आमटी, भाजीमध्ये वापरतो. तसेच धन्याशिवाय मसाल्याला चव सुद्धा येत नाही. धन्याचे बरेच औषधी गुणधर्म आहेत. धन्याचा वापर केल्याने भाजी, आमटीला एकप्रकारचा छान सुगंध येतो व चवपण छान लागते.
धने पेरून त्यापासून आपल्याला कोथंबीर मिळते टे आपल्याला माहीत आहेच. आजकालच्या काळात बंगलो पद्धत जाऊन बिल्डिंगमध्ये छोटी मोठी घरे ही पद्धत आहे. तरी आपण आपल्या बाल्कनी मध्ये कुंडीत धने लाऊन रोज ताजी कोथंबीर मिळवू शकतो. ताजी कोथंबीर वापरून आपल्या भाजी आमटीला अजून छान चव येते.
कोथंबीर ही रुचीवर्धक, शरीरातील गरमी नष्ट करते तसेच ती पाचक आहे. कोथंबीरीने आपले जेवण स्वदिस्ट, रुचकर, सुगंधी बनते. कोथंबीरीची चटणी, भाजी तसेच वड्या चवीस्ट लागतात.
कोथंबीरीला जी पांढरी फुले येतात त्यामध्येच धने येतात. सुकवलेले धने जिरे घेऊन आपण त्याची धने-जिरे पावडर बनवतो त्याचा वापर आपण भाजी व तसेच आमटी मध्ये करतो.
धने हे शुभ समजले जातात. त्यामुळे आपण धन्याचा वापर आपण शुभ कार्यात करतो. प्रसादासाठी आपण धने व गुळ देतो.
धने हे चवीला तिखट, तूर्त, कडवट, मधुर व हलके असतात. ज्यांना पिक्ताचा त्रास होतो त्यांनी धन्याचा सढळ वापर करावा. दुध, साखर व धने हे रोज सकाळी उकळून प्यल्याने पचनशक्ती सुधारते. धने, जिरे, पुदिना, मिरे, मीठ व बेदाणे हे जीनस वापरून बनवलेली चटणी अरुची दूर करून रुची निर्माण करते. धने व बेदाणे भिजत घालून कुस्करून त्याचे पाणी सेवन करावे त्याने बरेच फायदे होतात.
धने व खडी साखर सेवन केल्याने पोटातील दाह कमी होतो, छातीतील कफ कमी होतो, पोट दुखी बरी होते, अजीर्ण कमी होते, पचनशक्ती सुधारते.
धन्या पासून तेल काढले जाते. हे तेल वातहरक असल्याने अपचन व पोट शुलावर त्याचा फायदा होतो.
असे धन्याचे औषधी गुणधर्म आहेत.