चहाचे गुणधर्म: चहा हे पेय सगळ्याच्या परिचयाचे आहे. चहा प्रतेकाच्या घरी बनवला जातो. चहा म्हणजे चहाच्या झाडाची पाने ही पाने सुकवली जातात त्यालाच चहा असे म्हणतात. ही चहाची पाने गरम केलीकी च्या सुगंध सगळीकडे दरवळतो.
चहा हा मादक असतो. चहाहा कडक बनण्यासाठी त्यावर वेगवेगळी प्रक्रिया करून त्याला भेसळयुक्त बनवता. आपल्याला सकाळी उठल्यावर व दुपारी चहा घ्यायची सवय असते. चहा घेतला की आपल्याला ताजेतवाने वाटते तसेच शरीरातील आळस निघून जातो.
चहाच्या पाना पासून तेल काढले जाते व त्या तेलाचा औषध बनवण्यासाठी उपयोग केला जातो. चहामध्ये टँनीन, कँफिन व तेल असते. चहामधील टँनीन व कँफिन हे एकप्रकारचे विषच आहे. तसेच चहामधील तेला मुळे आपल्यातील निद्रानाश करणारा विकार होतो. चहामुळे मानवी शरीरावर खूप वाईट परिणाम होत असतो. आपल्या ह्रुदयाचे स्पंदन वाढते. स्नायुवर परिणाम होतो. ह्या दोन्ही गोष्टी आपल्या शरीराच्या दृष्टीने घातक आहेत.
आपण चहा कडक बनवण्यासाठी तो जास्त उकळतो. पण चहा जास्त उकळला की चवीला फार छान लागतो पण तो जास्त उकळलाकी चहा मधील टँनीक अँसिड जास्त निर्माण होते. त्यामुळे आपल्या यकृतावर वाईट परिणाम होतो व रक्त वाहिन्याचे आवरण कठीण बनते.
काही जणांना चहा घेतल्या शिवाय काम सुचत नाही. ह्यालाच चहाचे व्यसन असे म्हणतात. हे चहाचे व्यसन जाणे फार कठीण असते. चहा घेण्यामुळे मेदूपेक्षा मांसधातूवर उत्तेजक असा परिणाम करते. हे खरे आहे की चहा घेतल्यावर थकवा कमी होतो पण आपल्या पचनशक्तीवर त्याचा वाईट परिणाम होतो. खरम्हणजे चहा मध्ये कोणतेही पोषक घटक नसतात. असे म्हणतात की चहा हे बुद्धिजीवी लोकांचे मेंदूचे काम करणाराचे व थंड प्रदेशातील लोकांचे आवडते पेय आहे.
चहा बनवण्याची खर म्हणजे एक पद्धत आहे. ह्या पद्धतीने चहा बनवला तर तो चवीला छान लागतो व त्याचे वाईट परिणाम कमी होतात.
चहा बनवतांना पाणी नेहमी ताजे घ्यावे कारण त्या पाण्यामध्ये ऑंक्सीजन असते. चहा बनवण्यासाठी ठेवलेले पाणी प्रथम उकळावे मग त्यामध्ये प्रमाणात चहा पावडर घालावी मग त्यामध्ये साखर व गरम दुध घालून मिक्स करून चहा सर्व्ह करावा. अश्या प्रकारचा चहा मुरला की चवीला छान लागतो. चहा मध्ये काही गुणधर्म सुद्धा आहेत, त्यामुळे जठरास जागरूती उत्पन करतो. रुची उत्पन करतो. त्वचा व मुत्रा शयावर त्याचा परिणाम होतो त्यामुळे आपल्याला घाम येतो. लघवी साफ होते. व शरीरातील मरगळ दूर होते. जेवणा नंतर ४ तासांनी चहा घ्यावा म्हणजे आपले राहिलेले अन्न पचन होण्यास मदत होते.
चहाचा मधुर स्वाद लहान मुलांना आवडतो पण लहान मुलांना चहा देऊ नये. चहाचे अती सेवन त्यामुळे आपले शरीर कमकुवत होते. पचनशक्ती कमी होते. रक्त दाब वाढतो. सहनशीलता कमी होते.