सकाळ टाईम्स यांनी कॅमेलिया सोसायटी, वानवडी, पुणे ह्या ठिकाणी दिनांक २८ एप्रिल २०१८ रोजी लहान मुलांसाठी सुंदर हस्ताक्षर व महिलांसाठी पाककला स्पर्धा आयोजित केली होती. पाककला ह्या महिलांच्या स्पर्धेचे परीक्षण करण्यासठी सुजाता नेरुरकर व उषा लोकरे यांना बोलवण्यात आले होते.
सकाळ टाईम्सचे व्यवस्थापक श्री जाधव, श्री वाघ व मिसेस प्रयागा ह्यांनी ह्या स्पर्धेचे आयोजन केले होते. ह्यांनी ह्या दोनी स्पर्धा खूप छान आयोजित केल्या होत्या. तसेच कँमेलिया सोसायटीमधील राहणाऱ्या सभासदानी खूप छान प्रतिसाद दिला होता.
सकाळ उद्योग समूह हे नेहमीचांगले वेगळे उपक्रम करीत असतात. ह्या वेळी त्यानी लहान मुलांसाठी सुंदर हस्ताक्षर ही स्पर्धा ठेवली होती. बऱ्याच लहान मुलांनी ह्या स्पर्धे मध्ये भाग घेतला होता. हस्ताक्षरह्या स्पर्धेचे परीक्षण श्री रमेश गाढवे ह्यांनी केले होते. श्री रमेश गाढवे ह्यांनी गणपती बाप्पाची नवीन नवीन चित्र काढून दाखवली होती व मुलांना चांगले हस्ताक्षर कसे काढायचे ह्याबद्दल मीहिती दिली होती.
कँमेलिया सोसायटीमधील राहणाऱ्या सभासद महिलांनी मोठ्या संखेनी भाग घेऊन विविध नवीन नवीन पदार्थ बनवले होते. ह्या स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक कविता सोनी , दुसरा क्रमांक भारती भुतडा, तिसरा क्रमांक संगीता सातव ह्यांना मिळाला.
खरच सकाळ उद्योग समूह ह्यांनी हा महिलांसाठी छान उपक्रम चालू केला आहे. त्यामुळे महिलांना आपल्या मधील कला दाखवता आली.