मखाने म्हणजे कमळाचे बी आहे. मखाने मध्ये पौस्टिकतेचे भरपूर गुण आहेत. मखाने मध्ये प्रोटीन, कैल्शियम, पोटेशियम, फास्फोरस, आयर्न, केरोटीन, विटामिन बी-१, वसा, खनिज तत्व व सोडियम च्या बरोबर ते एंटीऑक्सीडेंट़् आहे. त्याच्या मुळे ते आपल्या आरोग्यासाठी गुणकारी आहे व ते आपल्या शरीराला तंदुरुस्त ठेवते. ह्यामध्ये असे काही औषधी गुणधर्म आहेत की ते आपल्या पचनशक्ती पासून किडनीचे रोग सुद्धा दूर करते. आपल्या इथे भारतात उपासाच्या दिवशी खाण्याची प्रथा आहे.
मखाने हे चवीस्ट आहेत व त्याच्या सेवनाने ताकद येते व त्याचे गुण आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेमंद सुद्धा आहेत. मखानेच्या सेवनाने बऱ्याच रोग समस्या दूर होतात व बदाम व अक्रोड पेक्षा ते उत्तम आहेत.
काही जणांना रात्री झोप येत नाही. त्यानी रात्री झोपताना गरम दुधा बरोबर मखानेचे सेवन केले तर निद्रानाश दूर होतो. ह्यामध्ये एंटीऑक्सीडेंट्सचे गुण आहेत. व आपली रोग प्रतिकारशक्ती वाढते. कैल्शियमचे प्रमाण ह्यामध्ये भरपूर आहे. त्यामुळे हाडे मजबूत होतात. अर्थराइटिस गुडघेदुखी थांबते.
रोज मखानेचे सेवन केले तर शरीराला थंडपणा मिळतो. मखाने नेहमी साजूक तुपावर भाजून खावे. किडनीचे कार्य नेहमी चांगले राहते.
ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहते. चक्कर, भीती व अशक्तपणा ह्या समस्या दूर होतात. दुधाबरोबर ह्याचे सेवन केले तर डोके शांत राहते. तसेच भूक पण लागते. पचनशक्ती सुधारते.
ज्या गर्भवती महिला आहेत त्यानी व डिलीवरी नंतर जेव्हा अशक्तपणा येतो त्यासाठी मखाने खाणे फायदेशीर आहे. महिलांनी मखाने खाणे खूप फायदेशीर आहे कारण की महिलांमध्ये कैल्शियमचे प्रमाण कमी असते.
ज्यांना मधुमेह आहे त्यांनच्या साठी मखाने इंसुलिनचे कार्य करते. शुगर कंट्रोलमध्ये रहाते. असे हे गुणकारी मखाने आहेत.