भारतामध्ये साधारणपणे लोक गहू वापरुन त्यापासून चपाती बनवून त्याचे सेवन करतात. पण काही ठिकाणी लोक बाजरीची भाकरी किंवा रोटी खाणे पसंद करतात. बाजरीचे सेवन केल्याने आपली पचनशक्ती सुधारते व त्याच बरोबर अजून काही रोग सुद्धा बरे होतात.
The Marathi Bājarīchi Bhākarī Rōṭī Kāṇyācē Aarōgyadāyī Phāyadē can of be seen on our YouTube Channel of Benefits of Pearl Millet
बाजरीमध्ये भरपूर औषधी गुणधर्म आहेत. बाजरी चवीला मधुर, गरम, रुक्ष, व कफ पासून आराम देते व वातपिक्तकारक आहे. तिच्या सेवनाने त्वचा चमकदार बनण्यास मदत होते, हृदयासाठी फायदेमंद, शक्ति देणारी, पचनशक्ती चांगली करून भूक लागण्यास मदत करणारी.
बाजरीमध्ये प्रोटीन, फाइबर, मैग्नीशियम, फास्फोरस, फाइबर व आयर्न सारखे पोषक तत्व भरपूर प्रमाणात आहेत. पूर्वीच्या काळी असे म्हणत की बाजरी गरिबांचे खाणे आहे पण त्याचे गुणधर्म पहाता आता बरेचजण बाजरीचे सेवन करू लागले आहेत. बाजरीच्या भाकरी बरोबर आपण लसूण चटणी सर्व्ह करू शकतो. महाराष्ट्रात थालपीठ ही खूप लोकप्रिय आहे त्यामध्ये जास्तीत जास्त बाजरीचे प्रमाण वापरले जाते.
बाजरी सेवनाचे फायदे:
बाजरी ग्लूटेन फ्री असून त्याचे शरीराला बरेच फायदे आहेत. बऱ्याचवेळा असे दिसून येतेकी ग्लूटेन युक्त आहार सेवन करतात पण त्यामुळे पचनक्रिया मध्ये अडचण येते. म्हणून लोक ग्लूटेन फ्री आहाराचा समावेश करतात. म्हणूनच लोक बाजरी सेवन करणे जास्त पसंद करतात.
बाजरीमध्ये फायबर ही जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे पोटाचे विकार बरे होण्यास मदत होते.
डायबीटीज असणाऱ्या लोकानी बाजरी सेवन करणे फायदेशीर आहे त्यामुळे डायबीटीज कंट्रोलमध्ये राहतो.
शरीराचे वाढलेले वजन कमी करण्यासाठी बाजरी खूप फायदेमंद आहे. करणकी त्यामध्ये फायबर जास्त प्रमाणात आहे त्यामुळे लवकर भूक लागत नाही.
बाजरीमध्ये कैलशीयम भरपूर आहे त्यामुळे हाडांचे आरोग्य चांगले राहते. लिवर संबंधीत रोग कमी होतात. ऊर्जा मिळते. गर्भवती महिलांसाठी बाजरी खाणे फायदेशीर आहे. स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी फायदेमंद आहे.
उच्च रक्तदाब, हृदया संबंधीत तक्रारी कमी होतात. शरीराचे आरोग्य थंड राहून झोप चांगली येते.