लोणच्याच्या खाराचा ठेचा: खाराचा ठेचा बनवतांना हिरव्या मिरच्या, मोहरीची डाळ, व मेथीची पूड वापरली आहे. हा ठेचा ४-५ महिने चांगला टिकतो. ह्याला नाव लोणच्या च्या खाराचा ठेचा असे नाव का दिले तर हा ठेचा बनवतांना मोहरीची डाळ व मेथीची पूड वापरली आहे जी आपण लोणचे बनवतांना वापरतो. त्यामुळे ह्या ठेच्याची चव खूप छान लागते.
The English language version of the same Thecha recipe and its preparation procedure can be seen here – Pickle Masala Thecha
बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट
वाढणी: ३०० ग्राम बनतो
साहित्य:
२५० ग्राम हिरव्या ताज्या मिरच्या
१/२ वाटी मोहरीची डाळ
१ टी स्पून हळद
१ टी स्पून मेथीची पूड
१ टी स्पून हिंग
१/४ कप लिंबूरस
१/२ वाटी मीठ चवीने (मीठ थोडे जास्तच घालावे जसे आपण लोणच्याला घालतो तसे)
कृती: प्रथम हिरव्या मिरच्या धुऊन, पुसून कोरड्या कराव्यात. मग पाट्यावर हिरव्या मिरच्या वाटुन घ्याव्यात. मिरच्या वाटुन झाल्याकी काढून घ्याव्यात व लगेच मोहरीची डाळ थोडीशी वाटुन घ्यावी. मग एका बाऊलमध्ये वाटलेल्या मिरच्या, मोहरीची डाळ, हळद, मेथीची पूड, हिंग, लिंबूरस व मीठ घालून मिक्स करून सर्व्ह करावा. हा ठेचा ४-५ महिने चांगला रहातो.