कोकणी पद्धतीचे काजूचे लोणचे: कोकण म्हंटले की तेथील हापूस आंबा, फणस, कोकम, काजू हे पदार्थ डोळ्या समोर येतात. कोकणा मधील काजूचे लोणचे लोकप्रिय आहे. काजूचे हे झटपट लोणचे तयार करून लगेच खाण्यासाठी छान आहे. कोणी अचानक घरी पाहुणे आले तर हे लोणचे बनवायला छान आहे तसेच निह्मीच्या लोणच्या पेक्षा निराळे आहे. लहान मुलांना चपाती बरोबर द्यायला पण छान आहे.
The English language version of the same Cashew-Nut Pickle and its preparation can be seen here – Konkani Kaju Lonche
बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट
वाढणी: २५० ग्राम लोणचे बनते
साहित्य:
२५० ग्राम काजू (तुकडा)
१ टी स्पून लाल मिरची पावडर
२ टे स्पून लिंबूरस
१ टी स्पून हळद
साखर व मीठ चवीने
फोडणी करीता:
२ टे स्पून तेल
१ टी स्पून हिंग
कृती: प्रथम काजूचे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्या. मग त्यामध्ये हळद, लाल मिरची पावडर, साखर व मीठ घालून मिक्स करा.
कढाईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये हिंग घालून मिक्स करून घ्या. मग तयार केलेली फोडणी काजू वरती घालून मिक्स करून लिंबूरस घाला व चांगले ढवळून घ्या. काजूचे हे लोणचे २-३ दिवस छान रहाते.