लसणाच्या पातीचा ठेचा: लसणाच्या पातीचा ठेचा म्हणजे बाजारात लसणाची पात मिळते त्या पासून बनवला जातो. लसूण हा आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे तसेच माणूस निरोगी तेजस्वी, ताकदवान व दीर्घायुषी बनतो. लसुणामध्ये जीवनसत्व “बी” , “सी” व “ए” आहे.
बनवण्यासाठी वेळ: १०-१५ मिनिट
वाढणी: २-३ जणासाठी
साहित्य:
२०-२५ लसणाची पाते किंवा १ कप लसूण पात चिरून)
३ हिरव्या मिरच्या
१/२ कप कोथंबीर (चिरून)
मीठ चवीने
१ छोटे लिंबूरस
१/४ टी स्पून साखर
कृती:
लसूण पात निवडून स्वच धुवून चिरून घ्या. मग लसूण पात, हिरव्या मिरच्या, कोथंबीर, मीठ व साखर घालून मिक्सरमध्ये थोडेसे जाडसर वाटुन घ्या. मग लिंबूरस घालून परत एकदा मिक्सर मध्ये फिरवून घ्या.
लसणाच्या पातीचा ठेचा गरम गरम चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर सर्व्ह करा.