तिळाचे औषधी गुणधर्म: तीळ हे आपल्या परिचयाचे आहेत. तिळामध्ये तीन प्रकार आहेत. पांढरे तीळ, काळे तीळ व लाल तीळ.
तीळ हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहेत. तसेच तिळाच्या तीनही प्रकारामध्ये काळे तीळ हे पौस्टिक असून आयुर्वेद मध्ये ह्याचा उपयोग औषध बनवण्यासाठी करतात. धार्मिक कार्यात तीळाला फार महत्व आहे. तिळाच्या सेवनाने कोलेस्टेरॉल नियंत्रित राहण्यास मदत होते. सांधेदुखीवर तिळाच्या तेलाने मसाज केल्याने लवकर आराम पडतो. तिळाच्या तेलाने अभ्यंग केल्याने त्वचेचा कोरडे पणा निघून जातो.
तीळ हे चवीला तिखट, कडवट, मधुर व तुरट असतात. तीळ हे गरम, कफकारक, पित्तकारक, बलदायक, केसांसाठी हितावह त्वचेसाठी हितावह दातासाठी हितावह, बुद्धीप्रद आहेत.
पांढरे तीळ व साखर पाक करून त्यापासून रेवडी बनवतात. ही रेवडी पौस्टिक आहे. तीळाचा वापर करून बनवलेला स्वयंपाक रुचकर लागतो. अनेक पदार्थामध्ये तीळ वापरले जातात. तीळ व गुळ घालून बनवलेला चिक्की मलवर्धक, वायूनाशक, कफ व पिक्तकारक आहे.
रोज सकाळी उठल्यावर तीळ चवून खावे. तीळ खाऊन झाल्यावर पाणी प्यावे हा प्रयोग थोडे दिवस करावा त्यामुळे जे अशक्त माणसे आहेत ते सशक्त बनतात व जे स्थूल आहेत ते बारीक होतात. दात कमकुवत असतील तर ते मजबूत बनतात. शरीराची कांती तेजस्वी बनते. केस गळण्याचे थांबते व केसांची चांगली वाढ होते. पण हा प्रयोग निदान १०-१२ महिने नियमाने केला पाहिजे. रोज तीळचे सेवन केल्यामुळे मुत्रविकारातही फायदा होतो.
तिळाचे तेल हे सुद्धा हितकारक आहे. थंडीमध्ये गाल, ओठ, हात-पाय फुटतात तेव्हा त्यावर तिळाचे तेल लावले तर फायदा होतो. तिळाचे तेल हे पौस्टिक आहे पण थोडे कडवट असते.
थंडीच्या दिवसामध्ये तीळाचा लाडू, तिळाची वडी, तिळाची चटणी, तिळाची भाकरी, तिळाची पोळी अगदी आवर्जून खातात.