चिकन किंवा मटन सूप पुलाव: आपण नेहमी चिकन किंवा मटन पुलाव बनवतो. सूप पुलाव हा स्वादीस्ट व पौस्टिक आहे. तसेच बनवण्यासाठी सोपा आहे. हा पुलाव बनवतांना ह्यामध्ये चिकन किंवा मटन सूप बनवून घेतले आहे व त्या सुपामध्ये पुलाव शिजवून घेतला आहे. तसेच सर्व्ह करतांना वरतून तळलेला कांदा, व ड्रायफ्रुटने सजवले आहे.
The English language version of the same Soup Pulao recipe and it preparation method can be seen here – Non-Veg Soup Pulao
बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
२५० ग्राम चिकन किंवा मटन तुकडे
१” आले तुकडा
२ मोठे कांदे (चिरून)
२ मोठे कांदे (बारीक चिरून)
१८ काळे मिरे
१” दालचीनी तुकडा
२ लवंग
४ हिरवे वेलदोडे
१/२ कप तूप
२ मोठे कांदे (उभे पातळ चिरून)
१५ बदाम
१/४ कप किसमिस
१ लिंबूरस
३ कप बासमती तांदूळ
२ अंडी (उकडून)
मीठ चवीने
कृती: कांदे उभे पातळ चिरून घ्या. कढईमधे तूप गरम करून त्यामध्ये कांदा कुरकुरीत तळून घेऊन व बाजूला ठेवा. बदाम व किसमिस तळून घ्या. अंडी उकडून सोलून घ्या. तांदूळ धुवून घ्या.
एका जाड बुडाच्या भांड्यात दीड लिटर पाणी गरम करायला ठेवून त्यामध्ये चिकन किंवा मटन तुकडे, आले ठेचून, कांदा बारीक चिरलेला, मिरे ठेचून, दालचीनी, लवंग, हिरवे वेलदोडे, मीठ चवीने घालून मिक्स करून मंद विस्तवावर पाणी निम्मे आटे परंत उकळवून घ्या. मग चाळणीमध्ये ओतून पाणी वेगळे काढून घ्या.
एका जाडबुडाच्या भांड्यात गाळलेले चिकन किंवा मटन सूप गरम करायला ठेवून त्यामध्ये धुतलेले पाणी व मीठ घालून मंद विस्तवावर पुलाव शिजवून घ्या.
पुलाव गरम गरम सर्व्ह करा. सर्व्ह करतांना वरतून तळलेला कांदा, बदाम व किसमिसने सजवा.