कारल्याचे सूप: कारली ही स्वादाने कडू असली तरी हितावह आहेत, आपण कारल्याची भाजी किंवा कारल्याचे लोणचे बनवतो. कारल्याचे सूप सुद्धा बनवता येते. आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य प्रमाणात सहाही रसांची आवशकता असते. जे ए खाद्या रस कमी प्रमाणात मिळाला किंवा नाही मिळाला तर शरीराचा समतोल बिघडतो. ज्याप्रमाणे आंबट, खारट, तिखट, तुरट, आणि मधुर रसाची आवशकता असते त्याप्रमाणे कडू रसाची सुद्धा आवशकता असते.
कारल्याचे सूप हे हितावह आहे. हे सूप एक आठवडा सतत घेतल्यामुळे कृमीचा नाश होतो व पचनक्रिया मंद झाली असता सुधारते.
The English language translation of the same soup recipe can be seen here – Bitter gourd/melon soup
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: २ जणासाठी
साहित्य:
४ मध्यम आकाराची कारली
मीठ व साखर चवीने
१ टे स्पून कोथंबीर (चिरून)
१ टी स्पून मिरे पावडर
कृती: कारली स्वच्छ धुवून त्याच्या गोलाकार चकत्या कापून घ्या.
एका भांड्यात दोन कप पाणी घेऊन त्यामध्ये कारल्याच्या चकत्या घालून मंद विस्तवावर १०-१५ मिनिट शिजवून घ्या. कारली शिजल्यावर पाणी गाळून घ्या. गाळलेल्या पाण्यात मीठ, साखर, मिरी पावडर , चिरलेली कोथंबीर घालून गरम गरम सर्व्ह करा.