टोमाटो रायते: टोमाटो रायते हे मेन जेवणामध्ये बनवायला छान आहे. टोमाटो रायते बनवतांना राजोरी केळी, हिरव्या मिरच्या, कोथंबीर घालून वरतून तुपाची फोडणी घातली आहे. हे रायते चवीला छान लागते व वेगळ्या प्रकारचे आहे.
बनवण्यासाठी वेळ: १५ मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
२५० ग्राम टोमाटो
१ राजोळी केळे
२ हिरव्या मिरच्या
१/४ कप कोथंबीर (चिरून)
१ टे स्पून दही
१ टी स्पून लाल मिरची पावडर
मीठ व साखर चवीने
फोडणी साठी:
१ टी स्पून तूप
१ टी स्पून मोहरी
४-५ मेथी दाणे
७-८ कडीपत्ता
कृती: टोमाटो धुवून कापून घ्या. केळे सोलून त्याचे गोल काप करा.
एका कढईमधे तूप गरम करून त्यामध्ये मोहरी, मेथी दाणे, कडीपत्ता नंतर त्यामध्ये चिरलेले टोमाटो, हिरव्या मिरचीचे तुकडे टाकावे व १/२ कप पाणी घालून टोमाटो थोडे शिजवावे. मग त्यामध्ये मिरची पूड, मीठ व साखर घालून मिक्स करा. एक वाफ आल्यावर त्यामध्ये केळ्याच्या चकत्या घालून कोथंबीर घालून सर्व्ह करावी.