चिकन चटीनाड: चिकन चटीनाड ही डीश तामिळनाडू मध्ये लोकप्रिय आहे. चिकन चटीनाडही एक चवीस्ट व स्वादिस्ट डीश आहे. ह्या आगोदर आपण मोगलाई चिकन, हैद्राबादी चिकन, कोकणी चिकन तसेच महाराष्ट्रीयन चिकन बनवले आता हे तामिळनाडू पद्धतीचे चिकन पण चवीस्ट लागते.
The English language version of the same chicken gravy recipe can be seen here – Tasty Chettinad Chicken Curry
बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य: चिकन मुरवण्यासाठी:
५०० ग्राम चिकन (तुकडे)
१/२ कप दही
१ टे स्पून आले-लसूण पेस्ट
२ टे स्पून लाल मिरची पावडर
१ टी स्पून मिरे पावडर
१/२ टी स्पून गरम मसाला
१/२ टी स्पून चाट मसाला
मीठ चवीने
चिकन करीसाठी:
२ मोठे कांदे (बारीक चिरून)
२ मोठे टोमाटो (चिरून अथवा प्युरी)
२ हिरव्या मिरच्या (चिरून)
१ टी स्पून लाल मिरची पावडर
२ टे स्पून आले-लसूण पेस्ट
१ टी स्पून गरम मसाला
१ टी स्पून चाट मसाला
१ टी स्पून मिरे पावडर
मीठ चवीने
फोडणी करीता:
२ टे स्पून तेल
१ टी स्पून मोहरी
१०-१२ कडीपत्ता पाने
२ लाल सुक्या मिरच्या
एक चिमुट हिंग
कृती:
चिकनचे तुकडे धुवून घ्या. कांदा बारीक चिरून घ्या. टोमाटो चिरून घ्या किंवा उकडून मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्या. आले-लसूण पेस्ट बनवून घ्या.
चिकन भिजवून ठेवण्यासाठी: एका भांड्यात चिकनचे तुकडे, दही, लाल मिरची पावडर, गरम मसाला, चाट मसाला, आले-लसूण पेस्ट, मिरे पावडर, मीठ घालून मिक्स करून एक तास फ्रीज मध्ये ठेवा.
एका जाडबुडाच्या भांड्यात तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, लाल मिरच्या, कडीपत्ता, हिंग घालून बारीक चिरलेला कांदा घालून २-३ मिनिट मंद विस्तवावर परतून घ्या. कांदा परतून झालाकी त्यामध्ये टोमाटो प्युरी, हिरवी मिरची घालून ३-४ मिनिट परतून घ्या.
मग त्यामध्ये भिजवलेल चिकन घालून, लाल मिरची पावडर, गरम मसाला, चाट मसाला, मिरे पावडर, मीठ घालून ५ मिनिट परतून घ्या. चिकन परतून झाले की त्यामध्ये तीन कप पाणी घालून भांड्यावर झाकण ठेवून १०-१२ मिनिट चिकन शिजवून घ्या.
गरम गरम चिकन भाता बरोबर किंवा पराठा बरोबर सर्व्ह करा.