कोबी + मेथी + शिमला मिर्च सलाड: कोबी + मेथी + शिमला मिर्च सलाड हे टेस्टी लागते. हे सलाड बनवतांना कोबी किसून, मेथीची भाजी चिरून, शिमला मिर्च चिरून घेऊन वरतून मिरे पावडर, मीठ व लिंबूरस घातला आहे. हे सलाड बनवतांना भाज्या कच्या घेतल्या आहेत.
The English language version of the same salad recipe can be seen here – Cabbage-Fenugreek-Capscium Salad
बनवण्यासाठी वेळ: १५ मिनिट
वाढणी:४ जणासाठी
साहित्य:
२ कप कोबी (किसून)
३/४ कप ताजी मेथी पालेभाजी (चिरून)
१ छोटी शिमला मिर्च (चिरून)
१ टी स्पून मिरे
१ टी स्पून लिंबूरस (किंवा चवीने)
साखर व मीठ चवीने
कृती: कोबी धुवून किसून घ्या. मेथीची भाजी स्वच्छ धुवून चिरून घ्या. शिमला मिर्च धुवून चिरून घ्या.
एका बाऊलमध्ये किसलेला कोबी, चिरलेला मेथी भाजी, शिमला मिरची, मिक्स करून त्यामध्ये मिरे पावडर, लिंबूरस, मीठ व साखर घालून मिक्स करून सर्व्ह करा.