मटार + फरसबी + डाळींब सलाड: मटार + फरसबी + डाळींब सलाड हे चवीला उत्कृष्ट लागते. बनवायला सोपे व झटपट होणारे आहे. हे सलाड बनवण्यासाठी ताजे हिरवे मटार, फरसबी व डाळिंबाचे दाणे वापरले आहेत तसेच दही मिक्स करून थंड सर्व्ह करायचे आहे. हे सलाड बनवतांना तेलाचा अथवा तुपाचा वापर केलेला नाही व भाज्या थोड्या उकडून घेतल्या आहेत.
The English language version of this Salad recipe can be seen here – Green Peas Pomegranate Farasbi Salad
बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
१ कप हिरवे ताजे मटार
१ कप फरसबी (श्रावण घेवडा)
१/२ कप डाळिंबाचे दाणे
१ कप दही
१ टी स्पून मिरे पावडर
मीठ चवीने
कृती: फरसबी धुवून उभी चिरून घ्या. दही एक सारखे करून घ्या.
जाडबुडाच्या बुडाच्या भांड्यात २-३ कप पाणी घेऊन गरम करायला ठेवा मग त्यामध्ये हिरवे ताजे मटार व फरसबी घालून थोडी उकडून घेऊन पाणी गाळून घ्या.
उकडलेले मटार व फरसबी एक बाऊलमध्ये घेऊन त्यामध्ये फेटलेले दही, मीठ, मिरे पावडर व डाळिंबाचे दाणे मिक्स करून घ्या. नंतर तयार केलेले सलाड फ्रीजमध्ये थंड करायला ठेवा. जेवणाच्या वेळेस सर्व्ह करा.