नारळी मसाला भरलेली अंडी: भरलेली अंडी हा एक जेवणातील चांगला प्रकार आहे. ह्या आगोदर आपण अंडा करी, मसाला अंडी असे बरेच अंड्याचे प्रकार पाहिले. भरलेला अंडी हा एक वेगळा प्रकार आहे. ह्या मध्ये सारणासाठी उकडलेल्या अंड्यातील पिवळा भाग, डेसिकेटेड नारळ व करी मसाला वापरलेला आहे.
The English language version of the same eggs dish can be seen here – Masala Bharli Andi
बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट
वाढणी: ३-४ जणासाठी
साहित्य:
१ मोठा कांदा
१ कप डेसिकेटेड नारळ
६ अंडी
१ टी स्पून करी मसाला
२ टी स्पून गरम मसाला
२ टे स्पून बटर
मीठ चवीने
कृती: कांदा बारीक चिरून घ्या. डेसिकेटेड कोकनट १/४ कप पाण्यात १० मिनिट भिजत ठेवा. अंडी उकडून सोलून अर्धी चीर देऊन त्यामधील पिवळा भाग काढून घ्या.
सारणासाठी अंड्यातील पिवळे, डेसिकेटेड नारळ, करी पावडर, गरम मसाला, मीठ व एक टे स्पून बटर घालून मिक्स करून सारण तयार करून घ्या. तयार केलेले सारण अंड्याच्या पांढऱ्या भागामध्ये भरून घ्या.
एका कढईमधे राहिलेले बटर गरम करून त्यामध्ये चिरलेला कांदा घालून २ मिनिट परतून घ्या किंवा ब्राऊन रंगावर परतून घ्या. मग त्यामध्ये एक कप गरम पाणी घालून चांगली उकळी आणून भरलेली अंडी घालून मंद विस्तवावर परत एक उकळी आणा.
गरम गरम भरलेली अंडी पराठा बरोबर सर्व्ह करा.