आंब्याची रसमलाई: आंब्याची रसमलाई ही एक छान डेझर्ट रेसिपी आहे. एप्रिल-मे महिना आला की आंब्याचा सीझन चालू होतो. आंब्याच्या पल्प पासून आपण काही डिशेश बनवू शकतो. Mango रसमलाई बनवतांना दुधामध्ये आंब्याचा रस व फ्रेश क्रीम घालून दुध बनवले आहे. रसगुल्ला बनवतांना पनीर, खोया, मिल्क पावडर व वेलचीपूड घालून एक सारखे मळून घेतले आहे. त्याचे गोळे बनवून त्यामध्ये आंब्याचा तुकडा घालून रसगुल्ले बनवले आहे. मग बनवलेल्या दुधामध्ये गोळे घालून थंड करून घेतले आहे.
The English language version of this Rasmalai recipe can be seen here- Amba Rasmalai
बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: ४-६ जणासाठी
साहित्य: रसगुल्लेसाठी:
१ कप पनीर
१ कप खवा
२ टे स्पून मिल्क पावडर
१ टी स्पून वेलचीपूड
१ कप आंब्याचे तुकडे
दुधासाठी:
१/२ लिटर दुध
१/२ कप साखर
१ कप आंब्याचा रस
१/४ कप फ्रेश क्रीम
१/२ कप आंब्याचे तुकडे
ड्रायफ्रुटचे तुकडे
कृती: दुधाकरीता: दुध व साखर मिक्स करून १० मिनिट मंद विस्तवावर गरम करून घ्या. मग थंड झाल्यावर त्यामध्ये फ्रेश क्रीम, आंब्याचा रस मिक्स करून फ्रीजमध्ये थंड करायला ठेवा.
रसगुल्लाकरीता: पनीर व खवा किसून घ्या. किसलेल्या पनीर-खवामध्ये मिल्क पावडर व वेलचीपूड घालून चांगले मिक्स करून घ्या. मग मळलेल्या पीठाचे छोटे १५ गोळे बनवा. गोळे बनवतांना त्यामध्ये एक एक आंब्याचा तुकडा ठेवून गोळा बंद करा. अश्या प्रकारे सर्व गोळे बनवून घ्या.
फ्रीज मध्ये थंड करायला ठेवलेले दुध बाहेर काढून त्यामध्ये बनवलेले गोळे घालून मिक्स करून परत फ्रीजमध्ये थंड करायला ठेवा. आंब्याची रसमलाई थंड सर्व्ह करा. सर्व्ह करतांना वरतून ड्रायफ्रुटसि सजवा.