प्याजकी सब्जी: प्याजकी सब्जी म्हणजेच कांद्याची भाजी होय. कधी कधी घरामध्ये भाजी संपलेली असते व काय करावे हा प्रश्न पडतो. आपल्या घरामध्ये कांदे नेहमी असतात. भाजी नसली तर आपल्याला कांद्याची भाजी बनवता येते. कांद्याची भाजी बनवायला सोपी व झटपट होणारी आहे. ही भाजी चपाती बरोबर किंवा पराठ्या बरोबर सर्व्ह करता येते.
The English language version of the same Onion Vegetable Dish can be seen here – Pyaz Ki Sabzi
बनवण्यासाठी वेळ: २५ मिनिट
वाढणी: ३-४ जणासाठी
साहित्य:
५०० ग्राम कांदे १ टे स्पून वनस्पती तूप १/२ टी स्पून हळद १ टी स्पून लाल मिरची पावडर १ टी स्पून गरम मसाला १/४ कप कोथंबीर (चिरून) १/२ टोमाटो (चिरून) मीठ चवीने
कृती:
कांदे सोलून मध्यम आकारामध्ये चिरून घ्या.
कढईमधे तूप गरम करून घेऊन त्यामध्ये चिरलेला कांदा घालून त्यामध्ये हळद, लाल मिरची पावडर, गरम मसाला व मीठ घालून ४-५ मिनिट मध्यम विस्तवावर परतून घ्या.
नंतर कढईवर झाकण ठेवून मंद विस्तवावर कांदा शिजे परंत ठेवा. कांदा शिजल्यावर कोथंबीर घालून गरम गरम कांद्याची भाजी चपाती किंवा पराठ्या बरोबर सर्व्ह करा.