आंब्याची चटणी: आपण शेगदाण्याची चटणी, खोबऱ्याची चटणी, नारळाची चटणी अश्या अनेक प्रकारच्या चटण्या बनवतो. आंब्याची चटणी ही एक चवीस्ट चटणी आहे. आंब्याची चटणी छान आंबटगोड लागते. आंब्याची चटणी २-३ दिवस फ्रीजमध्ये चांगली राहते. कधी कधी चांगले आंबे सुद्धा आंबट निघतात त्यावेळी ते खाऊ शकत नाही तेव्हा अश्या प्रकारची चटणी करून बघा. ही चटणी बनवायला सोपी व झटपट बनणारी आहे.
The English language version of the same Chutney recipe can be seen here – Piklelya Ambyachi Chutney
बनवण्यासाठी वेळ: १० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
२ कप आंब्याचा रस
२ टे स्पून गुळ
२ लाल सुक्या मिरच्या
२ टी स्पून मोहरी
२ टे स्पून ओला नारळ
मीठ चवीने
कृती:
प्रथम लाल मिरच्या व मोहरी थोडीशी परतून घ्या व मिक्सरमध्ये बारीक बारीक पावडर करून घ्या. नारळ व गुळ मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
एका बाउलमध्ये आंब्याचा रस, लाल मिरची-मोहरी पूड, नारळ-गुळ व मीठ घालून मिश्रण एकसारखे करून घ्या. आंब्याची चटणी तयार झाली.