खमंग चिकन लॉलीपॉप: चिकन लॉलीपॉप ही एक छान चिकनची स्टार्टर रेसिपी आहे. चिकनचे आतापर्यंत आपण बरेच प्रकार बघीतले आहेत. चिकन लॉलीपॉप ही एक सोपी व झटपट होणारी रेसिपी आहे. ही एक चवीस्ट व अप्रतीम डीश आहे. चिकनच्या पीसेसना दही, लालमिरची पावडर, गरम मसाला, चाट मसाला, धने-जिरे पावडर, आले-लसून पेस्ट, मीठ लावून अर्धा तास भिजवून ठेवा. मग फक्त १५ मिनिट ओव्हनमध्ये बेक करा. लहान मुलांना ही डीश खूप आवडेल.
The English language version of the same recipe can be seen here – Spicy Chicken Lollipops
बनवण्यासाठी वेळ: २५ मिनिट
मँरिनेशन वेळ: ३० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य: ८ चिकनचे तुकडे
मँरिनेशनसाठी:
१ कप दही
२ टी स्पून लाल मिरची पावडर
१ टी स्पून गरम मसाला
१ टी स्पून धने पावडर
१ टी स्पून जिरे पावडर
१ टी स्पून चाट मसाला
१ टे स्पून आले-लसून पेस्ट
मीठ चवीने
२ टे स्पून तेल
सजावटीसाठी:
१ मध्यम आकाराचा कांदा
१/४ कप कोथंबीर (चिरून)
१/२ कप हिरवी चटणी
कृती: चिकनचे तुकडे धुऊन घ्या. कांद्याच्या चकत्या कापून घ्या. कोथंबीर चिरून घ्या. हिरवी चटणी बनवून घ्या.
एका मध्यम आकाराच्या बाऊलमध्ये दही, लाल मिरची पावडर, गरम मसाला, धने-जिरे पावडर, चाट मसाला, आले-लसून पेस्ट, मीठ, तेल व चिकनचे तुकडे घालून मिक्स करून फ्रीजमध्ये ३० मिनिट ठेवा.
एका नॉनस्टिक प्लेटवर हे तुकडे ठेवा.
मायक्रोवेव्ह ओव्हन गरम करून त्यामध्ये चिकनच्या तुकड्याची प्लेट ठेवून १८० डिग्री वर सेट करून १५ मिनिट बेक करून घ्या मग ५ ते ७ मिनिट रोस्ट करून घ्या.
लॉलीपॉप सर्व्ह करतांना त्यावर कांद्याच्या गोळ चकत्या व कोथंबीर घालून हिरव्या पुदिना चटणी बरोबर सर्व्ह करा.