चिकन एग फ्राईड राईस-कोंबडी अंडा पुलाव: चिकन एग फ्राईड राईस हा पौस्टिक आहे कारण ह्यामध्ये अंडे, कोबी, फ्लावर, शिमला मिर्च, गाजर ह्या भाज्या वापरल्या आहेत. तसेच चिकनचे पीसेस सुद्धा वापरले आहेत. सोया सॉस, चिली सॉस वापरला आहे त्यामुळे चायनीज राईस ची त्याला चव आली आहे. चिकन एग फ्राईड राईस बनवायला सोपा व मुलांना आवडणारा आहे.
The English language version of the same Pulao recipe can be seen here – Egg-Chicken Pulao
बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
२ कप बासमती तांदूळ
२ अंडी
१” आले (बारीक चिरून)
५ लसूण पाकळ्या (चिरून)
२ कप कोबी, फ्लावर, शिमला मिर्च, गाजर (बारीक चिरून)
१/२ कप पातीचा कांदा (चिरून)
१ कप चिकनचे तुकडे (शिजवून)
३ टे स्पून सोया सॉस
२ टे स्पून चिली सॉस
मीठ चवीने
अजिनोमोटो, मिरे पावडर चवीने
२ टे स्पून तेल
कृती:
भात मोकळा शिजवून थंड करायला ठेवा. भाज्या बारीक चिरून घ्या. चिकनचे तुकडे शिजवून घ्या. अंडी फोडून काटे चमच्यानी फेटून घ्या.
नॉन स्टिक भांड्यात १ टे स्पून तेल गरम करून त्यामध्ये फेटलेली अंडी घालून, मिरे पावडर, मीठ घालून भुर्जी बनवून घ्या.
एका कढईमधे १/२ टे स्पून तेल गरम करून चिरलेल्या भाज्या घालून २-३ मिनिट मंद विस्तवावर परतून घ्या. मग त्यामध्ये शिजवलेला भात, चिकनचे तुकडे घालून मिक्स करून घ्या.
एका कढईमधे १/२ टे स्पून तेल गरम करून त्यामध्ये चिरलेले आले, लसूण व पातीचा कांदा, अजिनो मोटो, सोया सॉस, चिली सॉस, मीठ, मिरे पावडर,शिजवलेला भात घालून ३-४ मिनिट परतून घ्या.
गरम गरम चिकन एग फ्राईड राईस सर्व्ह करा. सर्व्ह करतांना वरतून अननसच्या रिंगने सजवा.