खव्याची व्हनीला बर्फी : खव्याची व्हनीला बर्फी ही आपल्याला घरी मिठाईच्या दुकानातील बर्फी सारखी बनवता येते. ही मिठाई बनवायला सोपी व झटपट होणारी आहे. तसेच कमी खर्चात घरी बनवता येते. आपल्याला दिवाळी फराळा साठी सुद्धा बनवता येते.
The English language version of the same Vanilla Burfi can be seen here – Mawa Vanilla Barfi
बनवण्यासाठी वेळ: १५-२० मिनिट
वाढणी: २०-२५ पिसेस
साहित्य:
२५० ग्राम खवा
१ कप साखर
४ टे स्पून मिल्क पावडर
२ टे स्पून पिठीसाखर
१/४ टी स्पून व्हनीला इसेन्स
१ टी स्पून तूप
सजावटीसाठी चांदीचा वर्ख
कृती:
खवा हातानी मोडून घ्या. एका कढई मध्ये मोडलेला खवा व साखर मिक्स करून ५ मिनिट मंद विस्तवावर गरम करा पण सारखे हलवत रहा म्हणजे मिश्रण चिटकणार नाही. मग विस्तव बंद करून कढई खाली उतरवून ५-७ मिनिट थंड करायला ठेवा.
मिश्रण थंड झाले की त्यामध्ये मिल्क पावडर, पिठीसाखर व व्हनीला ईसेन्स घालून चांगले मिक्स करून घ्या.
एका स्टेनलेस स्टीलच्या प्लेट ला तूप लावून बनवलेले खव्याचे मिश्रण ओतून एक सारखे करून घ्या. वरतून चांदीचा वर्ख लावून २ तास झाकून ठेवा. मग त्याचे चौकोनी तुकडे कापून घ्या.