होममेड खवा चॉकलेट बर्फी: होममेड चॉकलेट बर्फी ही आपण कमी वेळात व कमी खर्चात घरी बनवु शकतो. ही बर्फी बनवण्यासाठी फक्त ताजा खवा पाहिजे. अगदी मिठाईच्या दुकानात बनवतात तशी बनते. होममेड चॉकलेट बर्फी आपण सणावाराला किंवा दिवाळीच्या फराळासाठी सुद्धा बनवु शकतो. तसेच गणपती उत्सवाच्या वेळी गणपती आरती नंतर खिरापत म्हणून सुद्धा देऊ शकतो.
The English language version of this Barfi recipe can be seen here – Mawa-Chocolate Barfi
बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट
वाढणी: ८ पिसेस
साहित्य:
२५० ग्राम खवा
१ कप साखर
४ टे स्पून मिल्क पावडर
२ टे स्पून पिठीसाखर
२ टे स्पून चॉकलेट सॉस
१ टी स्पून तूप
कृती: खवा किसून घ्या. कढई खवा, चॉकलेट सॉस व साखर घालून ५ मिनिट मंद विस्तवावर आटवत ठेवा. मिश्रण सारखे हालवत रहा नाहीतर खाली लागून बर्फीला करपट वास येईल. मिश्रण आटत आलेकी विस्तव बंद करून मिश्रण ५ मिनिट बाजूला थंड करायला ठेवा. मग त्यामध्ये मिल्क पावडर व पिठीसाखर घालून मिक्स करून घ्या.
एका स्टेनलेस स्टीलच्या प्लेटला तूप लावून खव्याचे मिश्रण ओतून एक सारखे करून घ्या. मग दोन तास प्लेट झाकून बाजूला ठेवा. मिश्रण थंड झाल्यावर चौकोनी वड्या कापून घ्या.