Paneer Sweet Corn Rolls Recipe in Marathi

Paneer Sweet Corn Rolls for Starters
Paneer Sweet Corn Rolls

पनीर स्वीट कॉर्न रोल: पनीर स्वीट कॉर्न रोल हे मुलांना किंवा मोठ्यांना सुद्धा नाश्त्याला किंवा जेवणात द्यायला छान आहेत. रोल बनवतांना दुधीभोपळा व दोडका किसून घेतला आहे. स्वीट कॉर्नचे दाणे उकडून घेतले आहेत. पनीर वापरले आहे जे सगळ्याच्या आवडीचे आहे. ह्या मध्ये मसाला काही वापरला नाही तसेच हे रोल पौस्टिक आहेत.

The Marathi language version of the same recipe can be seen here – Paneer Corn Chapati Rolls

बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: ८ रोल

साहित्य:
सारणासाठी:
१ कप दुधीभोपळा किसून
१ कप दोडका किसून
१/२ कप स्वीट कॉर्न दाणे (उकडून)
२०० ग्राम पनीर
१ मध्यम आकाराचा कांदा
१ मध्यम आकाराचा टोमाटो
२ हिरव्या मिरच्या (चिरून)
१ टे स्पून आले-लसूण पेस्ट
१ टी स्पून लिंबूरस
मीठ चवीने
१ टे स्पून तेल

आवरणासाठी:
२ कप गव्हाचे पीठ
२ टे स्पून बेसन
१ टे स्पून तेल
मीठ चवीने
तूप रोल भाजण्यासाठी

Paneer Sweet Corn Rolls for Starters
Paneer Sweet Corn Rolls

कृती:
आवरणासाठी: गव्हाचे पीठ, बेसन, तेल, मीठ व पाणी घालून घट्ट पीठ मळून घ्या. मळलेले पीठ ३० मिनिट भाजुला ठेवून मग त्याचे आठ एक सारखे गोळे बनवा.

सारणासाठी: दुधीभोपळा व दोडका सोलून किसून घ्या. मक्याचे दाणे उकडून घ्या. पनीरचे लहान तुकडे कापून घ्या. कांदा, टोमाटो बारीक चिरून घ्या.

एका कढईमधे तेल गरम करून त्यामध्ये कांदा, टोमाटो, आले=लसूण, हिरवी मिरची घालून एक मिनिट मंद विस्तवावर परतून घ्या. मग त्यामध्ये किसलेला दुधीभोपळा, दोडका, मक्याचे दाणे घालून २-३ मिनिट मंद विस्तवावर परतून घेऊन त्यामध्ये चिरलेले पनीर. मीठ, लिंबूरस घालून मिक्स करून विस्तवावरून खाली उतरवून घ्या.

रोल बनवण्यासाठी: पिठाचा एक गोळा घेऊन चपातीच्या आकाराचा लाटून घ्या. नॉन स्टिक तवा गरम करून घेऊन चपाती दोनी बाजूनी भाजून घ्या. भाजलेली चपातीवर दोन टे स्पून पनीरचे मिश्रण ठेवून त्याचा गोल रोल बनवून घ्या. अश्या पद्ध्तीने सर्व रोल बनवून घ्या. मग तूप वापरून सर्व रोल भाजून घ्या.
गरम गरम पनीर-स्वीट कॉर्न रोल टोमाटो सॉस बरोबर सर्व्ह करा.

 

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.