पनीर-कोकनट बर्फी: आपण आता परंत वेगवेगळ्या प्रकारच्या बर्फी किंवा वड्या पाहिल्या. पनीर वापरून नारळाची बर्फी ही चवीस्ट लागते. आपण सणावाराला किंवा इतर दिवशी सुद्धा बनऊ शकतो. ही बर्फी बनवतांना पनीर, नारळ, दुध व साखर वापरले आहे.
The English language version of the same Burfi recipe can be seen here – Paneer-Nariyal Barfi
बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: १५ वड्या बनतात
साहित्य:
१ कप पनीर
१ कप ओला नारळ (खोऊन)
१ ३/४ कप साखर
१ कप दुध
२ टे स्पून पिठीसाखर
१ टी स्पून वेलचीपूड
ड्राय फ्रुट सजावटीसाठी
कृती: पनीर किसून घ्या. नारळ खोऊन घ्या. एका स्टीलच्या प्लेटला तूप लाऊन घ्या.
एका कढईमधे किसलेले पनीर, ओला नारळ, साखर, दुध मिक्स करून मध्यम विस्तवावर घट्ट होई परंत आटवत ठेवा. मिश्रण आटले की तूप लावलेल्या स्टीलच्या प्लेटमध्ये ओतून थापून घ्या. थंड झाल्यावर चौकोनी आकाराच्या वड्या कापून घ्या.
वड्या कापल्यावर स्टीलच्या घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवा.