बेसनची मसाला चकली: हा एक चकलीचा वेगळा प्रकार आहे. बेसनची चकली बनवतांना तांदळाचे पीठ, ओवा, लाल मिरची पावडर, तील, व कलोनजी वापरली आहे. बेकिंग पावडर व मलई मुळे छान खुसखुशीत लागते. दिवाळी फराळासाठी छान आहे.
The English language version of this Chakli recipe can be seen here – Besan Chakli
बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट
वाढणी: ३०-३२ बनतात
साहित्य:
२ कप बेसन
१/२ कप तांदळाचे पीठ
१ टे स्पून ओवा
१ टे स्पून लाल मिरची पावडर
२ टे स्पून तीळ
१/४ टी स्पून बेकिंग पावडर
१ टी स्पून कलोनजी
२ टे स्पून ताजी मलई
मीठ चवीने
२ टे स्पून गरम तेल (मोहन)
तेल चकली तळण्यासाठी
कृती:
प्रथम बेसन छान गुलाबी रंगावर भाजून घ्या. (म्हणजे कच्च लागणार नाही), मग भाजलेले बेसन, तांदळाचे पीठ, ओवा, लाल मिरची पावडर, तील, बेकिंग पावडर, कलोनजी, मलई , मीठ घालून चांगले मिक्स करून घ्या. मग त्यामध्ये गरम तेलाचे मोहन घालून पीठ मळून घ्या. मळलेले पीठ १०-१५ मिनिट तसेच झाकून ठेवा, चकली बनवतांना सोरयाला आतून पाण्याचा हात लावून त्यामध्ये चकलीचे पीठ भरून चकल्या प्लास्टिकच्या पेपरवर पाडून घ्या.
कढईमधे तेल चांगले गरम करून मध्यम आचेवर चकल्या तळून घ्या. थंड झाल्यावर डब्यात भरून ठेवा.