चायनीज पध्दतीची बटाट्याची भाजी: चायनीज पद्धतीची बटाट्याची भाजी बनवण्यासाठी बटाटे अर्धवट उकडून घेतले व त्याचे लांब उभे तुकडे कापून घेतले (फ्रेंच फ्राईज बनवतांना जसे कापतो तसे) अश्या प्रकारची भाजी चवीला अगदी वेगळीच लागते.
The English language version of the same Chinese Veg preparation can be seen here – Chinese Potato Sabzi
बनवण्यासाठी वेळ: २५ मिनिट
वाढणी: ४-५ जणासाठी
साहित्य:
४ मोठ्या आकाराचे बटाटे
१” आले तुकडा (बारीक चिरून)
८-१० लसूण पाकळ्या (बारीक चिरून)
३-४ हिरव्या मिरच्या
ग्रेव्हीसाठी:
१/२ टे स्पून टोमाटो केचप
१ टे स्पून सोय सॉस
१/२ टे स्पून चिली सॉस
२ टे स्पून कॉर्नफ्लोर
१/२ कप पाणी मीठ चवीने
१/२ कप तेल
कृती: बटाटे धुऊन घेऊन ७०-७५% उकडून घेऊन सोलून त्याचे उभे लांब तुकडे करून घ्या. (जसे फ्रेंच फाईज साठी करतो तसे) आले-लसूण-हिरवी मिरची बारीक चिरून घ्या.
फ़्राईग पँन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये बटाट्याचे फिंगर्स २-३ मिनिट मध्यम विस्तवावर तळून घेऊन बाजूला काढून ठेवा. मग त्याच तेलामध्ये आले-लसूण-हिरवी मिरची थोडीशी परतून घेऊन त्यामध्ये बटाट्याचे फिंगर्स, टोमाटो केचप, सोया सॉस, चिली सॉस व मीठ घालून एक सारखे करून घ्या. अर्धा कप पाण्यात कॉर्नफ्लोर मिक्स करून बटाट्याच्या फिंगर्समध्ये मिक्स करून एक चांगली वाफ येऊ द्या.
चायनीज बटाट्याची रस्सा भाजी गरम गरम भाता बरोबर सर्व्ह करा.